Latest

Lok Sabha elections 2024 : शिवसेना खासदारांमध्ये नाराजी नाही; मुख्यमंत्री उमेदवारांची करणार घोषणा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात महायुतीचे जागावाटपाचे चर्चेचे गुन्हाळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. ते आता अंतिम टप्प्यात आल्याचे महायुतीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. जागावाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे भाजप श्रेष्ठींचे लक्ष लागले असून, त्यादृष्टीने आता हालचालींना वेग आला आहे. आज (दि.१९) मुंबईत शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. "शिवसेनेतील खासदार नाराज नाहीत. मुख्यमंत्री लवकरच उमेदवारांची नावे घोषीत करतील," असे बैठकीनंतर खासदार राहुल शेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रातील आपल्या वाट्याच्या २० जागांवरील उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली असली, तरी 'महायुती'तील इतर जागांवरचा तिढा कायम आहे. आता हा तिढा थेट दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी सुटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी दिल्लीला रवाना झाले असून, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपची तिसरी यादी २० मार्चपूर्वी जाहीर होईल, असे म्हटले आहे.

शिवसेना खासदारांमध्ये नाराजी नाही : शेवाळे

उमेदवारीबाबत शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीनंतर राहुल शेवाळे म्हणाले की, "शिवसेनेच्या खासदारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. महायुतीत एकवाक्यता असून खासदारांमध्ये नाराजी नाही. महायुतीचे उमेदवार घोषित होत नाहीत तोवर कुणीही विधान करू नये. एक-दोन दिवसात उमेदवारांची नावे जाहीर होतील," असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT