Latest

Lok Sabha Election 2024 : पनवेलमधील ४ माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पनवेलमधील ४ माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाणार. (Lok Sabha Election 2024) पनवेलमधील भाजपच्या माजी नगरसेविका निना घरत या ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर, मनसेचेही काही पदादिकारी प्रवेश करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Lok Sabha Election 2024)

ते म्हणाले, मावळ मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पनवेल पालिका आणि सिडको कडूनही मालमत्ता कर लावला जातो. लोढांच्या पलावा सिटीत मात्र करमुक्ती आहे. वसुली सरकारचा हा कर आकारणीचा विचित्र कर आम्ही नक्की थांबवू, असे वचन मी आज दोतो.

ठाकरे पुढे म्हणाले, मूळ प्रश्न सोडून अशक्यप्राय गोष्टी जाहिरनाम्यात आहेत. मावळ मतदरासंघ जेव्हापासून निर्माण झाला, तेव्हापासून शिवसेना पक्ष सोबत आहे. नवीन ताकद आज पनवेलमधून मिळाली आहे. लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो. देवेंद्र फडणवीसचं बोलले होते- मी पुन्हा येईन. पण ते दोन पक्ष फोडून पुन्हा आले. भाजपा आता फक्त जाहिरनामा प्रसिद्ध करत राहील. भाजपा आता सत्तेत येणार नाही. काही उमेदवार काँग्रेसकडून जाहीर व्हायचे शिल्लक आहेत. त्यानंतर एकत्रित सभा घेऊ. अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हारला. राज्यासाठी एकत्रित विचारनामा देण्याचा विचार सुरु असल्याचेही त्यांनी नमूद केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT