Latest

Lok Sabha Election 2024 | राजकीय मंथन सुरूच… अद्यापही उमेदवाराची निश्चिती नाहीच

अंजली राऊत

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्हा हा सध्याला राजकीय हालचालींचे केंद्र बनलेले आहे. खडसे बीजेपीत जाणार उन्मेश पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत प्रवेश करणार आणि त्यांच्या पत्नीला तिकीट मिळणार कारण पवारांना उमेदवारी मिळणार या चर्चेचे उधाण आलेले आहे असे असले तरी महाविकास आघाडी कडून दोन्हीही लोकसभेचे उमेदवार अजूनही निश्चित झालेले नाही. भाजपाचा 'एकला चलो' नारा जोर धरत आहे. तर दोन्ही महिला उमेदवारांच्या विरोधात विरोधकांनी बंड पुकारलेले आहे. अशा या बंडामध्ये भाजपा काय निर्णय घेणार व त्यांना कुठपर्यंत यश येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जळगाव जिल्हा ज्याप्रमाणे तापमानसाठी प्रसिद्ध आहेच पण नुकतेच जळगावचे तापमान 41 अंशापर्यंत गेलेले आहे. त्यामानाने राजकारणातील तापमान हे मायनस मध्ये गेलेले दिसून येत आहे कारण भाजपा शिवाय आघाडीने अजूनही उमेदवार जाहीर न केल्यामुळे राजकीय चित्र स्पष्ट झालेले नाही

जळगाव जिल्हा हा गुजरात व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेला लागून आहे. या जिल्ह्यामधील होणाऱ्या राजकीय हालचाली या राज्याच्या केंद्रबिंदूमध्ये राहतात. भाजपाचे संकट मोचक भाजपाला राज सत्तेत व येणाऱ्या अडचणींमध्ये मार्ग काढणारे संकट मोचक हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील असल्याने याला एक वलय प्राप्त झालेले आहे. मात्र या वलयामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या असल्याने व या दोन्ही जागेवरील उमेदवार महिला असल्याने राजकीय मंथन व उलथापालथ होण्यास सुरुवात झालेली आहे

जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील यांनी गेल्या वेळेस जशी अचानक एन्ट्री घेऊन खासदारकी पर्यंत पोचले होते व आपल्या कामातून देशातील दहा खासदारांमध्ये आले होते. मात्र तरीही भाजपाने त्यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी नाराजी दाखवीत पक्ष बदलण्याचे चर्चा सुरू झालेल्या आहेत. दुसरीकडे त्यांचे जिवलग मित्र करण पवार यांना जळगाव लोकसभेमध्ये उभे करून उन्मेश पाटील भाजप उमेदवार स्मिता वाघ यांना आव्हान देण्याचे चर्चेला उधाण आलेले आहे.

युतीमधील पक्ष अजूनही बैठकांमध्ये व्यस्त आहे व आपापल्या नाराजीचे सूर व्यक्त करीत आहेत. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी ते एकमेव खडसेंना टारगेट केलेले आहे ते कोणत्या पक्षात आहे हे अजूनही त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट होत नाही. शरद पवारांनी आमदारकी दिली त्या आमदारकीमध्ये कोण कोण होते याचा पाढा ते वाचताना दिसत आहे. मात्र ते आता जिल्हाध्यक्ष अजित पवार गटाचे आहेत हे ते वारंवार विसरताना दिसून येतात. एकनाथराव खडसे दिल्ली येथे गेल्यामुळे खडसे बीजेपीमध्ये जाणार काय? कसे? आमदारकीचा राजीनामा दिला ही चर्चा रंगत आहे. मात्र त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना विचारणा केली असता त्यांनी याचा स्पष्ट नकार दिला आहे.

युती मधली युती दिसून येत नाहीये तर महाविकास आघाडी मधला महाविकास किंवा त्यांचा उमेदवार अजूनही निश्चित होत नाहीये. त्यामुळे फक्त गप्पा, चर्चा आणि बैठकांचा जोर यांचे दौरे याच गोष्टी सुरू आहेत. कार्यकर्ते या गोष्टीमध्येच व्यस्त दिसून येत आहे. त्या जळगाव जिल्ह्याचा 41 अंशावर गेल्यामुळे तपमान चांगलेच तापलेले आहे. त्याच मानाने राजकारणातील राजकारणाची गती थंडावलेली  दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT