Latest

Lumpy : काष्टीतील जनावारांचा बाजार बंद; लम्पी आजाराचा धोका वाढला

अमृता चौगुले

काष्टी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्यात सर्वात मोठा आठवडे बाजार म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील काष्टीतील आठवडे बाजार ओळखला जातो. या बाजारात भरणारा जनावरांचा बाजार लम्पी आजारामुळे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा अधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी काढले आहेत. यामुळे शनिवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

काष्टी गाव 25 हजार लोकसंख्येचे असून, गावातील शनिवारचा आठवडे बाजार गाय, बैल, म्हैस ही जनावरे खरेदीसाठी राज्यात प्रसिध्द आहे. दर शनिवारी दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, हैद्राबाद, मध्य प्रदेश, बेगळूर, पुणे, मुंबई, बीड येथून जनावरे खरेदी-विक्रीसाठी व्यापारी मोठ्या संख्येने येतात. यामुळे गावच्या बाजारपेठेत त्याच्यांमुळे कोट्यावधींची उलाढाल होते. ही आता ठप्प होणार आहे.

राज्यतील विविध भागात जनावरांना लम्पी संसर्गजन्य आजार वाढला असून, शेतकर्‍यांची जनावरे लम्पी विषाणूपासून दक्षता घेण्यासाठी जिल्हा अधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या आदेशाने शनिवारपासून भरणारा जनावरांचे सर्व बाजार बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच, पुढील आठवड्यातील बाजार संदर्भात जिल्हा अधिकारी सालीमठ यांचा आदेश आल्याशिवाय भरणार नाही.

शेतकर्‍यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, ज्या जनावरांना लंम्पी झाला आहे. ती जनावरे इतर जनावरांपासून बाजूला बांधावित, तसेच गोठ्यात जंतुनाशक फवारणी करून संपूर्ण गोठा निर्जंतुकीकरण करावा, बाहेर गावातील, दुसर्‍या जिल्ह्यातील जनावरे काही दिवस आणू नये, पशुसेवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करून, आपल्या पशुंची काळजी घ्यावी, असे म्हंटले आहे.

भाजीपाला बाजार सुरु राहणार

लम्पी संसर्गजन्य आजारामुळे फक्त जनावरांचा बाजार बंद राहील. तसेच शेळी, मेंढी, लिंबू, यासह भाजीपाला बाजार व बाजारपेठ नेहमी प्रमाणे चालु राहील, याची शेतकरी व व्यापार्‍यांनी नोंद घ्यावी, असे ग्रामसेवक शरद कवडे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT