Latest

‘लायगर’ ऑगस्टमध्ये, ‘पिप्पा’ डिसेंबरमध्ये येणार

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

विजय देवरकोंडाचा पदार्पणाचा हिंदी चित्रपट असलेला 'लायगर : साला क्रॉस ब्रीड' पुढील वर्षी 25 ऑगस्ट रोजी रीलीज होणार आहे. 31 डिसेंबर रोजी या चित्रपटाची पहिली झलक समोर येणार आहे. विजयने स्वतःच सोशल मीडियातून ही माहिती दिली आहे. चित्रपटात अनन्या पांडेही मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड अशा पाच भाषात बनत असून पुरी जगन्नाथ याचे दिग्दर्शन करत आहेत.

तर अभिनेता ईशान खट्टरचा आगामी वॉर ड्रामा पिप्पा हा चित्रपट पुढील वर्षात 9 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. बांग्लादेश मुक्ती युद्धातील भारतीय जवानांच्या शौर्यावर हा चित्रपट आधारीत आहे. बांग्लादेश मुक्ती दिनाच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधत याच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली गेली. राजाकृष्ण दिग्दर्शित या चित्रपटात मृणाल ठाकुर, सोनी राजदान यांच्याही भूमिका आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT