Latest

कामाची बातमी! LIC च्या IPO मध्ये पैसे गुंतवायचेत ? तर लगेच PAN अपडेट करा; ही आहे प्रक्रिया

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: जर तुम्ही एलआयसीची पॉलिसी घेतली असेल आणि तुम्हाला त्यांच्या आयपीओमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर तुम्हाला तुमचा पॅन एलआयसीमध्ये अपडेट करणे आवश्यक आहे. एलआयसीने म्हटले आहे की, आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी पॉलिसीधारकाने रेकॉर्डमध्ये दिलेली पॅन माहिती बरोबर आहे की नाही हे तपासावे. जर ते बरोबर नसेल तर पॅन कार्डची माहिती अपडेट करून घ्यावी .

डीमॅट खाते महत्वाचे

जर एखाद्या पॉलिसी धारकाकडे सध्या डीमॅट खाते नसेल तर त्याला ते स्वतःच्या खर्चाने उघडावे लागेल. एलआयसीने स्पष्टपणे सांगितले की पॉलिसीधारक डीमॅट खाते उघडण्याचा आणि पॅन अपडेट करण्याचा खर्च उचलेल. महामंडळ कोणताही खर्च उचलणार नाही. आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की, एलआयसीचा IPO इश्यू साईझच्या 10% पर्यंत पॉलिसीधारकांसाठी राखीव आहे.

असे तपासा पॅन कार्ड अपडेट झाले आहे की नाही

1. https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus वर जा.

2. पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन माहिती तसेच कॅप्चा प्रविष्ट करा. त्यानंतर सबमिट बटण दाबा.

पॅनकार्ड असे अपडेट करू शकता

1. ऑनलाइन पॅन नोंदणीचा ​​पर्याय निवडा.

2. ऑनलाइन पॅन नोंदणी पृष्ठावरील PROCEED बटणावर क्लिक करा.

3. तुमचा ईमेल पत्ता, पॅन, मोबाइल नंबर, जन्मतारीख आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक प्रविष्ट करा.

4. बॉक्समध्ये कॅप्चा कोड प्रविष्ट करा.

5. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून ओटीपीसाठी विनंती करा.

6. ओटीपी मिळाल्यावर तो भरा आणि सबमिट करा.

7. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला यशस्वी नोंदणीचा ​​संदेश मिळेल.

80 हजार ते एक लाख कोटी उभारण्याची तयारी

उपलब्ध माहितीनुसार, एलआयसी या संदर्भात मर्चंट बँकर्स आणि इतर संबंधित संस्थांशी बोलत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) IPO मधून 80 हजार ते एक लाख कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. त्याचा इश्यू जानेवारी ते मार्च दरम्यान येऊ शकतो. अशा परिस्थितीत, देशातील हा सर्वात मोठा इश्यू खरेदी करण्यासाठी, गुंतवणूकदार त्यांचे सध्याचे समभाग बाजारात विकून पैसे उभे करतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT