Latest

सरसकट आरक्षणासाठी आणखी थोडा वेळ थांबू : मनोज जरांगे पाटील

दिनेश चोरगे

अंतरवाली सराटी; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी वेळ पाहिजे असेल तर वेळ घ्या. आपण अनेक वर्षे थांबलो आहोत, अजून थोडा वेळ थांबू, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मराठा समाज बांधवांना केले.

ते म्हणाले, मराठवाड्यात 13 हजार नोंदी सापडल्या आहेत. त्या नोंदीच्या आधारे तेवढ्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे ठरवले आहे. मात्र, मला हे मान्य नाही. आपण सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली आहे. ही गोष्ट सरकारच्या शिष्टमंडळाने मान्य केली आहे. त्यामुळे आता पुढे कोणती पावले सरकारकडून उचलली जाणार यावरही आपण लक्ष ठेवले पाहिजे.

आपण लवकरच राज्यभर दौरा करून मराठा समाज एकत्र यावा यासाठी समाजात जागृती करणार आहोत. सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर या काळात कापूस, ऊस आणि इतर शेतीची कामे उरकून घ्या. तसेच दिवाळीचा सण गोड करा, असेही ते म्हणाले.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावातल्या राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली होती. ती आता उठवा आणि नेत्यांना गावात घ्या, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात नोकरभरती करायची असल्यास मराठा समाजाच्या टक्केवारीनुसार जागा सोडा आणि मगच नोकरभरती करा ही आपली मागणी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मान्य केली आहे.

SCROLL FOR NEXT