Latest

पुणे: थोरांदळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

अमृता चौगुले

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले सुरूच आहेत. थोरांदळे गावातील पाटीलमळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार झाल्याची घटना शनिवारी (दि. 15) रात्री नऊच्या सुमारास घडली. यामुळे थोरांदळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. थोरांदळे गावच्या पूर्वेला पाटीलमळा आहे. तेथे विश्वनाथ सुदाम टेमगिरे हे शेतकरी राहतात. त्यांच्या गोठ्यालगतच उसाचे क्षेत्र आहे. शनिवारी सायंकाळी टेमगिरे यांनी शेळ्या, कालवड घरासमोरील गोठ्यात बांधल्या.

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अचानक कालवडीचा जोरात आवाज त्यांना आला. ते पळतच शेडमध्ये गेले असता बिबट्याने कालवडीवर हल्ला करून उसाच्या शेतात धूम ठोकली. बिबट्याने निम्मी कालवड फस्त केली होती. टेमगिरे यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली. रविवारी (दि. 16) सकाळी वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम, शिवराज दहातोंडे, वनसेवक महेश टेमगिरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

SCROLL FOR NEXT