Latest

लेक लाडकी योजना : १८ वर्षापर्यंत लाखाची शिक्षणासाठी मदत

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करण्याच्या हेतूने लेक लाडकी योजना शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. यामुळे समाजात मुलींबद्दल निर्माण झालेली नकारात्मक विचारसरणी बदलण्यास तसेच भ्रूणहत्येसारखे प्रकार थांबण्यास मदत होणार आहे. यामध्ये मुलींना 5 श्रेणीमध्ये एक लाखापर्यंत शिक्षणासाठी मदत देण्यात येणार आहे.

योजनेचा उद्देश

आर्थिक दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन भविष्य उज्ज्वल करणे.
समाजातील मुलींमधील असमानता दूर करणे.
मुलींबाबत सकारात्मक विचार विकसित करणे.

लागणारी कागदपत्रे

मुलीचे व पालकांचे आधार कार्ड मुलीचा जन्माचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र
मुलीची शैक्षणिक कागदपत्रे
कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचा दाखला मुलीचे व पालकांचे बँक पासबुक व खाते नंबर मुलीचे पासपोर्ट साईज फोटा.

पात्रता

मुलीचा जन्म सरकारी दवाखान्यात झाला असला पाहिजे.
महाराष्ट्रामधील रहिवासी असावी.
अर्जदाराकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड बंधनकारक.

मिळणारे अनुदान

पात्र मुलगी पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत असेल तर तिला त्यावर्षी पाच हजार रुपये. सहावीच्या वर्गात शिकणार्‍या मुलीला सहा हजार रुपये, अकरावीत शिकणार्‍या मुलीला 8 हजार रुपये उनदान देण्यात येणार आहे. 18 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थिनीला 75 हजार रुपये मिळणार.

अर्ज कोठे कराल

लेक लाडकी योजनेसाठी पंचायत समिती कार्यालयामध्ये अर्ज करता येईल.

SCROLL FOR NEXT