Latest

विधान परिषद पोटनिवडणूक : जगदीश शेट्टर यांच्यासह तिघेही बिनविरोध

Arun Patil

बंगळूर, पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद पोट निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, तिप्पनप्पा कमकनूर आणि एन.एस.बोसराजू यांची बिनविरोध निवड झाली आहे.

अर्ज मागे घेण्याची शुक्रवारी (दि.23 रोजी) शेवटची तारीख होती. मात्र भाजप आणि निधर्मी जनता दलाच्या वतीने एकही अर्ज सादर करण्यात आला नव्हता. त्यामुळे निवडणूक रिंगणात फक्त काँग्रेस उमेदवार होते. त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

भाजप सरकार सत्तेवर असताना माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, विधान परिषद पोटनिवडणूक ः बाबुराव चिंचनसूर आणि आर.शंकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे जून 30 रोजी पोट निवडणूक होणार होती. मात्र काँग्रेस व्यतरिक्त कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.

विधानसभा सचिव तसेच निवडणूक अधिकारी एम.के.विशालाक्षी यांनी हा निकाल जाहीर केला. माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या जागी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची निवड झाली आहे. आर.शंकर यांच्या जागी तिप्पनप्पा कमकनूर आणि बाबुराव चिंचनसूर यांच्या जागी फक्त एकाच वर्षासाठी मंत्री एस.एन.बोसराजू यांची निवड करण्यात आली आहे. चिंचनसूर यांचा कालावधी 17 जून 2024, आर.शंकर यांचा 30 जून 2026 आणि लक्ष्मण सवदी यांचा 14 जून 2028 पर्यंत कालावधी होता. नव्या सदस्यांची मुदतही हीच असेल.

SCROLL FOR NEXT