Latest

Pankaj Udhas : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाई डेस्क : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Pankaj Udhas) दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याचे समजते. उधास परिवाराने ट्विट करून निधनाची माहिती दिली आहे. (Pankaj Udhas) पंकज उधास मुंबईतील ब्रीच क्रँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. या रुग्णालयात त्यांनी आज सकाळी ११ वाजता शेवटचा श्वास घेतला. रिपोर्टनुसार, पंकज उधास यांना काही महिन्यांपूर्वी कॅन्सर डिटेक्ट झाला होता. मागील काही महिन्यांपासून ते कुणालाही भेटले नाही.

त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. फॅन्स सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

पंकज उधास यांची मुलगी नायाब उधासने एक इन्स्टा पोस्ट करून निधनाचे वृत्त शेअर केले आहे. पोस्टमध्ये तिने लिहिलं- खूप दु:खासोबत आम्हाला हे सांगावं लागत आहे की, पद्मश्री पंकज उधास यांचे २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. ते दीर्घकाळ आजारी होते.

गजल 'चिट्ठी आई है' मधून मिळाली ओळख

त्यांचा जन्म १७ मे, १९५१ रोजी गुजरातमधील जेतपूरमध्ये झाला होता. लोकप्रिय गजल 'चिट्ठी आई है' मधून त्यांना खूप ओळख मिळाली होती. ही गजल १९८६ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'नाम' मध्ये होती. अभिनेता संजय दत्त याची चित्रपटात भूमिका होती.

२००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

पंकज उधास यांचे अंतिम संस्कार उद्या मंगळवारी २६ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असल्याचे समजते.

SCROLL FOR NEXT