Latest

लक्ष्मीची पाऊले : म्युच्युअल फंडामध्ये विक्रमी गुंतवणूक

अमृता चौगुले

गेल्या आठवड्यात शुक्रवारी गुडफ्रायडेनिमित्त बँका व शेअर बाजाराला सुट्टी होती, त्यामुळे बुधवारी 13 एप्रिलला बाजार बंद होताना निर्देशांक 58,338 वर बंद झाला; तर निफ्टी 17475 वर स्थिरावला.
जानेवारी-मार्च 2022 या तिमाहीचे व पूर्ण आर्थिक वर्षाचे कंपन्यांच्या नक्त विक्रीचे व नक्त नफ्याचे आकडे प्रसिद्ध होऊ लागले आहेत. या सर्वांत इन्फोसिसची नेहमीच आघाडी असते. तिचा मार्च 2022 या तिमाहीसाठी 5,686 कोटी रुपयांचा नक्त नफा झाला आहे. मार्च 2021 च्या तिमाहीसाठी 5076 कोटी रुपयांचा नक्त नफा होता. त्यात यंदा 12 टक्क्यांची वाढ झालेली दिसते. या तिमाहीतील ही वाढ गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक वाढ आहे. डिसेंबर 2021 च्या तिमाहीसाठी नफा 5809 कोटी रुपये होता. या तिमाहीतील वाढत्या नफ्यामुळे आपल्या कंपनीच्या समभाग धारकांना प्रति समभाग 16 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

जागतिक पेट्रोलच्या उत्पादनात यावेळी बरीच घट दिसेल. असा अंदाज ऑईल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंपन्यांच्या शिखर संघटनेनी (ओपेक) तेलाची जागतिक मागणी कमी व्हावी, असा अंदाज व्यक्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी रशिया-युक्रेनमध्ये युद्ध झाल्यामुळे त्या देशातील पेट्रोलचे उत्पादन कमी झाले आहे. जगात सध्या हळूहळू, पण निश्चितपणे महागाई वाढत आहे. कारण पेट्रोल व डिझेलचा पुरवठा निश्चितपणे कमी होत आहे. जगातील कच्च्या तेलाची दैनंदिन मागणी पुढील काही महिने दिवस मोठा होत चालल्याने कमीच होत राहणार आहे. ही मागणी 36.7 लाख बॅरलच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. ओपेकने आधी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा हे प्रमाण 4.80 लाख बॅरल इतके कमी असेल.

रशियाने युक्रेनवर फेब्रुवारी 2022 मध्ये हल्ला केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढून ती प्रती बॅरल 139 डॉलरपर्यंत गेली होती. 2000 सालानंतरची ही विक्रमी किंमत आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती खाली याव्यात म्हणून अमेरिकेसह सर्व देशांनी आपल्या कच्च्या तेलाचा राखीव साठा बाजारात आणला होता. तरीही कच्च्या तेलाच्या एका बॅरलची किंमत 100 डॉलरच्या वरच राहिली. या तेलाच्या उत्पादनाला (एुळिीू ऊरींश) नाही. त्यामुळे अडवणूक करण्यासाठी साठा वाढवला जाऊ शकतो.
भारतात गेली काही वर्षे पेट्रोल आपल्याकडे कुठे मिळेल का, यासाठी जरी प्रयत्न करीत असला तरीही सध्याच्या तेल विहिरी खोल करण्यात आणि नवीन विहिरी शोधण्यात भारत आळशीच आहे. त्यामुळे आपली 80 टक्के गरज आयात करूनच भागवली जाते. त्यातल्या त्यात सेसा गोवा, केर्न इंडिया या दोन कंपन्यांचे आग्रहण वेदांत कंपनीने केले असून तेल संशोधनासाठी त्यांचा प्रयत्न हैदराबादच्या परिसरात व राजस्थानमध्ये नवीन साठे शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.  श्री. आगरवाल यांच्या वेदांत या कंपनीतर्फे हे प्रयत्न जारी आहेत.
कच्च्या तेलाच्या एकूण उत्पादनापैकी अमेरिका 16 ते 18 टक्के उत्पादन करते.

शेजारील मेक्सिको या देशातही पेट्रोल हुडकण्यासाठी तिचे प्रयत्न जारी आहेत. प्रत्येकी 12 टक्के उत्पादन रशिया व सौदी अरेबियात होते. भारत आपली 60 टक्के गरज ओपेक देशातून आयात करून भागवतो. तेलासाठी अन्न (ऋेेव षेी जळश्र) अशा प्रयोगातून धान्यपुरवठा इराक, इराण या देशांना करून तिथून पेट्रोल आयात केले जाते. अशा प्रयोगामुळे भारतासाठी डॉलरवरील ताण कमी होत आहे.

सौदी अरेबिया, इराण, इराक आणि व्हेनिझुएला या चार देशांचा ओपेकमध्ये समावेश होतो. मात्र हे देश प्रत्येक बॅरलमागे तीन ते चार डॉलर अतिरिक्त किंमत लावतात. 'एशियन प्रीमियम'च्या नावाखाली वरील ओपेक देश भारत, चीन, जपान आणि अन्य आशियाई देशांकडून अतिरिक्त डॉलरची वसुली करतात.

शेअर बाजारातील चढउतार आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून सतत समभागांची होत असलेली लक्षणीय विक्री या पार्श्वभूमीवर देशातील गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांवरील विश्वास अजूनही कायम आहे. मार्च 2022 मध्ये इक्विटी फंडांमध्ये 28 हजार 463 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली आहे.

डॉ. वसंत पटवर्धन

SCROLL FOR NEXT