Latest

Kotak Mahindra Bank Share | RBIच्या निर्बंधानंतर कोटक बँकेला मोठा फटका! शेअर्स १० टक्क्यांनी घसरले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : डेटा सुरक्षेची चिंता आणि आयटी पायाभूत सुविधांची कमतरता असल्याचा हवाला देत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी कोटक महिंद्रा बँकेला (Kotak Mahindra Bank) तात्काळ प्रभावाने नवीन ग्राहक जोडणे आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यापासून रोखले. दरम्यान, बँक त्यांच्या सध्याच्या ग्राहकांना सेवा देणे सुरू ठेवू शकते, जे क्रेडिट कार्डधारक आहेत.

आरबीआयने या निर्बंधामुळे कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स गुरुवारी सकाळच्या व्यवहारात गडगडले. सुरुवातीच्या व्यवहारात कोटक बँकेचा शेअर्स (Kotak Mahindra Bank Share Price) तब्बल १२ टक्क्यांनी घसरून १,६२० रुपयांवर आला. सकाळी १० च्या सुमारास हा शेअर्स बीएसई सेन्सेक्सवर १० टक्के घसरणीसह १,६६० रुपयांवर व्यवहार करत होता.

दरम्यान, सेन्सेक्स गुरुवारी सकाळच्या व्यवहारात २०० अंकांनी वाढून ७४ हजारांवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी २२,४५० च्यावर पोहोचला.

भारतीय रिझर्व्ह बँकेने कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंगद्वारे क्रेडीट कार्ड देण्यावर बुधवारी (२४ एप्रिल) बंदी घातली. त्याचबरोबर बँकेने ऑनलाईनरित्या नवीन ग्राहकांचे खाते उघडू नये असेही आदेश दिले. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली.

बुधवारी भारतीय रिझर्व्हे बँकेने खासगी बँक असलेल्या कोटक महिंद्राला नवीन क्रेडीट कार्ड आणि ऑनलाईन ग्राहकांचे खाते उघडू नये असे आदेश दिले. त्यामुळे कोटक महिंद्रा बँकेला मोठा फटका बसला. कोटक महिंद्रा बँक ही ऑनलाईन बँकिंग क्षेत्रामध्ये ग्राहकांना देत असलेल्या सुविंधामध्ये आयटीशी संबंधित सुरक्षा कारणाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आरबीआयला कोटक महिंद्रा बँकेच्या आयटीप्रणालीमध्ये त्रुटी दिसल्या होत्या. याप्रकरणी कोटक महिंद्रा बँकेकडून आरबीआयने उत्तरही मागितले होते. पण कोटक महिंद्रा बँकेने दिलेल्या उत्तरावर आरबीआयचे समाधान झाले नाही. २०२२ आणि २०२३ मध्ये आयटीप्रणालीच्या तपासानंतर आरबीआयने ही कारवाई केली. बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या ३५ अ नुसार ही कारवाई करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT