Latest

KOO APP : फेसबुकला भारतीय पर्याय देणार्‍या ‘कू’ अ‍ॅपवर राजकारण्यांचीही गर्दी

backup backup

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : फेसबुकसारख्या सोशल मीडियाला टक्‍कर देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कू या भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला. कू अ‍ॅपवर आतापर्यंत १८०० हून अधिक राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील ८,००० प्लस प्रतिष्ठीत व्यक्ती दाखल झाले असून, एक लाखाहून अधिक वापरकर्त्यांनी गेल्या सहा महिन्यांत हे अ‍ॅप वापरणे सुरू केले आहे. (KOO APP)

'कू'चे संस्थापक आणि सीईओ, अप्रमेय राधाकृष्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, कू अ‍ॅप आता महाराष्ट्रासह भारताच्या राजकारण्यांमध्ये पसंतीचे ठरत असून, 20 हून अधिक जागतिक भाषांमध्ये या अ‍ॅपवर संवाद साधता येत असल्याने विविध राज्यांचे नेते 'कू' वर दाखल झाले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अलीकडेच हे अ‍ॅप वापरू लागले आहेत. (KOO APP)

याशिवाय केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी, पीयूष गोयल, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. सुप्रिया सुळे, शिवसेनेच्या खा. प्रियांका चतुर्वेदी, पश्‍चिम बंगालच्या ममता बॅनर्जी देखील आपल्या पाठीराख्यांशी कू वर संवाद साधू लागल्या आहेत. कू हे अ‍ॅप टायगर ग्लोबल आणि एक्सेल भागीदारांसह जागतिक गुंतवणूकदारांचा पाठिंबा लाभलेले स्वतंत्र स्टार्टअप असून, आजपर्यंत, याचे 60 दशलक्षाहून अधिक डाउनलोड आहेत आणि 100 पेक्षा जास्त देशांमध्ये वापरले जावू लागले आहे. (KOO APP)

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT