Latest

Cold and Cough | ‘हे’ घरगुती उपाय करा, सर्दी, खोकला पळवून लावा

backup backup

हिवाळा, उन्हाळा, पावसाळा अशा तिन्हीही ऋतूंची सुरुवात झाली की बर्‍याच जणांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरू होतो. सध्या आपल्याला या तिन्ही ऋतूंचा अनुभव येत आहे. ऋतू बदलाचे परिणाम काही जणांचे शरीर सहनच करू शकत नाही. मग न झोपू देणारा खोकला आणि श्वास कोंडणारी सर्दी हैराण करते. हिवाळ्यात तर हा आजार बहुतांश जणांना होतोच होतो. त्यावर कितीही अँटिबायोटिक घेतली तरी हट्टी आजार लवकर जातच नाही. पण याचबरोबर काही घरगुती उपायांचा अवलंब केला तर काही प्रमाणात सर्दी पळवून लावण्यात यश मिळते. (Cold and Cough)

लिंबू अर्धा कापून त्यावर काळी मिरी पावडर व मीठ भुरभुरून टाकून चोखल्यास आराम मिळतो. लवंग, तुळशीची पाने, खडीसाखर, आल्याचा एक तुकडा, गवती चहाचा एक चमचा ग्लासभर पाण्यात टाकून त्याचा उकळून अर्धा ग्लास काढा करावा. हा काढा तीन दिवस घेतल्यास आराम पडतो. रात्री झोपताना गरम तवा किंवा कोळशाचा निखार्‍यावर जोंधळ्याचे पीठ घालून त्याची धुरी घ्यावी. डोक्यावर पांघरून घेऊन झोपल्यास सर्दीचा त्रास कमी होतो.

एक इंच आले कुटून त्याचा रस रात्री झोपताना घेतल्यास खोकल्याचा त्रास कमी होतो. चमचाभर शुद्ध मधात चिमूटभर पांढरी मिरी टाकून दिवसातून तीन ते चार वेळा घ्यावे. असे चार दिवस घेतल्यास खोकल्याचा त्रास निघून जातो. सर्दी आणि खोकल्याने आवाज बसल्यास रात्री झोपताना अर्धा चमचा ओवा खावा, त्यावर ग्लासभर पाणी पिऊन झोपावे. यावर काहीही खाऊ नये. असे दोन दिवस गेल्यास बसलेला आवाज सुटू शकतो.

आवाज बसला असल्यास दिवसभरात ज्येष्ठमध चघळावे. चार दिवस घेतल्याने आवाज सुटू शकतो. तसेच रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. जेणेकरून घसा शेकला जाईल. हिवाळ्यात खोकला होऊ नये म्हणून रोजच्या जेवणात तीन ते चार पाकळ्या लसूण घ्यावा. यामुळे खोकला होण्याचे प्रमाण कमी होते. खोकल्याचा त्रास जास्त होत असेल, तर औषधांबरोबरच सकाळी आणि रात्री झोपताना गरम पाणी प्यावे. रात्री झोपताना दूध गरम करून त्यात हळद घालून प्यावे. खोकला कमी होतो. (Cold and Cough)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT