Latest

कोकण अलर्ट मोडवर! दोन दिवस वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाची शक्यता

backup backup

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  शुक्रवारसह आगामी दोन दिवस कोकण किनारपट्टीत वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस पडण्याच्या शक्यतेने कोकणातील सर्व जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना हवामान विभागाने केल्या आहेत.

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आगामी दोन दिवस अवकाळी पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही अवकाळी स्थिती उद्भवली तर कोकण पट्ट्यातील आंब्यासह काजूचा हंगाम जवळपास संपुष्टात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

जानेवारी महिन्यापासून अवकाळी पावसाच्या सातत्याने आंबा आणि काजू बागा संपुष्टात आल्या आहेत. त्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवल्याने आंबा उत्पादक शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाला. आंबा हंगामाच्या सुरुवातीपासूनच अवकाळीने आंब्याचे मोठे नुकसान केले आहे. यंदा केवळ 10 टक्के पीक शेतकर्‍यांच्या हाती लागले आहे. असताना ही अवकाळी बागायतदरांना उद्ध्वस्त करू शकते, अशी कैफियत आता बागायतदारांनी मांडली आहे. मार्च महिन्यातच 1 लाख पेटी येणार आंबा एप्रिल महिना अंतिम टप्प्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT