Latest

बीकेसीमध्ये ‘कोणी केली गद्‌दारी’ गाण्याचा धुमाकूळ

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईल डेस्‍क : एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा आज बीकेसी मैदानावर हाेत आहे. या मेळाव्‍यापूर्वी व्‍यासपीठावर 'कोणी केली गद्‌दारी' या गाण्‍याच्‍या माध्‍यमातून उद्‍धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्‍त्र सोडले. या गाण्‍याची चर्चा मेळाव्‍या स्‍थळी हाेती.

शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर तर शिवसेनेचा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवर होत आहे. बीकेसी मैदानाची आसनक्षमता एक ते सव्वा लाख असली तरी शिंदे गटाने किमान 5 लाख कार्यकर्ते मुंबईत धडकतील इतक्या गाड्यांची व्यवस्था केली आहे. शिवाजी पार्कची बैठक क्षमता 80 हजार ते 1 लाख असली तरी तिथेही मैदान ओसंडून गर्दी उरेल अशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ठाकरेंशी एकनिष्ठ असलेल्या राज्यभरातील पदाधिकार्‍यांनीही शक्य तितक्या गाड्या बुक करून शिवसैनिकांच्या प्रवासाची सोय केली आहे.

SCROLL FOR NEXT