Latest

कोलकाता मेट्रोने रचला इतिहास! हुगळी नदीतील बोगद्यातून मार्गक्रमण

Arun Patil

कोलकाता, वृत्तसंस्था : कोलकाता मेट्रोने बुधवारी इतिहास रचला. कोलकाताहून (महाकरण स्थानक) निघालेली ही ट्रेन हुगळी नदीतील बोगद्यातून मार्गक्रमण करीत हावड्यातील स्थानकावर (हावडा मैदान) पोहोचली. रेल्वेत फक्त अधिकारी आणि अभियंते होते.

रेल्वेतील वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिली. कोलकातासह लगतच्या विविध उपनगरांतील लोकांना आधुनिक परिवहन व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे क्रांतिकारक पाऊल ठरले आहे. मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. उदयकुमार रेड्डी हे स्वत:ही या ऐतिहासिक प्रवासात सहभागी झाले होते. देशात सर्वात आधी पश्चिम बंगालमध्येच मेट्रो ट्रेनला सुरुवात झाली होती, हे येथे उल्लेखनीय! आता हुगळी नदीच्या प्रवाहाखालून मेट्रो ट्रेन नियमितपणे ये-जा करणार आहे. हुगळी नदीखाली अंडरवॉटर बोगदा आता पूर्णपणे सज्ज असून, डिसेंबर 2023 पासून रेल्वेगाड्या त्यातून धावू लागतील.

SCROLL FOR NEXT