Latest

कोल्‍हापूर : वारे वसाहतीत दोन गटात जोरदार राडा; महिलेसह दोघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

निलेश पोतदार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा 

शहरातील वारे वसाहत येथे आज (शनिवार) सायंकाळी दोन गटात जोरदार राडा झाला. यामध्ये एका महिलेसह चौघेजण जखमी झाले असून, पृथ्वी आवळे (वय 24) राहणार वारे वसाहत कोल्हापूर या तरुणाची प्रकृती गंभीर बनली आहे. डोक्याला, छातीला आणि पाठीला गंभीर इजा झाल्याने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हाणामारीत तलवार, चाकू, कोयता आणि एडका यासारख्या घातक शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात येत आहे. जखमी पृथ्वी आवळेसह दादासाहेब माने, सुजल कांबळे आणि रुपाली आवळे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही गटाकडील जखमींच्या नातेवाइकांनी शासकीय रुग्णालय आवारात मोठी गर्दी केली होती.

शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय राणे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष जाधव यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा शासकीय रुग्णालयसह घटनास्थळी दाखल झाला होता. तरुणाची प्रकृती गंभीर बनल्याने वारे वसाहत येथे सायंकाळी तणाव निर्माण झाला होता.

SCROLL FOR NEXT