Latest

दोन्हीही मतदारसंघ शिवसेनेचे, फारसा बदल नाही : खा. धनंजय महाडिक

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत. विद्यमान खासदार शिवसेनेचे आहेत. त्यामध्ये फारसा बदल होईल, असे वाटत नाही. त्यामुळे संयम ठेवून वाट पाहिली पाहिजे, असे सूचक विधान भाजपचे खा. धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही खा. महाडिक यांनी केला.

खा. महाडिक म्हणाले, लोकसभेवेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेते येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत 400 पार जागा मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात नेत्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. कोल्हापुरातील कोणतीही जागा पाहिजे, असा आग्रह, हट्ट अथवा मागणी पक्षाने अथवा मी वैयक्तिक केलेली नाही; मात्र शिवराजसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात भाजपला एक जागा द्यावी. त्याचा विधानसभेला उपयोेग होईल, अशी मागणी केली होती.

खा. महाडिक म्हणाले, महायुतीत जागावाटपाचा कोणताही घोळ नाही. महायुतीचे नेते सक्षम असल्याने चित्र स्पष्ट आहे. महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची तयारी आणि क्षमता आहे. संग्रामसिंह कुपेकर हे तालुक्याचे नेते. त्यांनी काय वक्तव्य केले, ते केव्हाचे आहे, हे तपासावे लागेल; मात्र युती धर्म म्हणून भाजपच्या पदाधिकार्‍यांनी अशी वक्तव्ये करू नयेत. कार्यकर्त्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करावे अथवा अशी वक्तव्ये करू नयेत.

भाजपची पहिली यादी जाहीर झाल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांत थोडा संभ्रम आहे. एक-दोन दिवसांत निर्णय होईल. महाराष्ट्रातील
मतदानास वेळ आहे. वरिष्ठ नेत्यांना चर्चा करण्यास वेळ आहे.

SCROLL FOR NEXT