Latest

कोल्हापूर : म्हाळुंगेतील वेश्या व्यवसाय चालणाऱ्या फार्म हाऊसवर छापा; ३ जण ताब्यात

अमृता चौगुले

पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील मसाई पठाराच्या पायथ्याशी असलेल्या म्हाळुंगे येथील एका फार्म हाऊसवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. तर तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याबाबत पन्हाळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसाई पठाराखाली असलेल्या म्हाळुंगे गावातील सूरज वरेकर याच्या मालकीच्या शहाजी फार्म हाऊसवर म्हाळुंगे नावाने असलेल्या घरात रवींद्र पांडुरंग करले (वय 30, रा. दत्तात्रय कॉलनी वडणगे) फार्म हाऊस मालक सुरज विश्वास वरेकर (वय 29) व प्रसाद आनंद महाडिक (वय 33, दोघे रा. माळुंगे, ता. पन्हाळा) हे अनैतिक धंदे व वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पोलिसांनी शहाजी फार्म हाऊसवर गुरुवारी (दि.१६) रात्री बाराच्या सुमारास छापा टाकला. यावेळी अनैतिक व्यापारासाठी आणलेल्या तीन तरुणी या ठिकाणी आढळून आल्या. यातील पीडित तरुणी या कलकत्ता तसेच कोल्हापूर पाचगाव व पुणे येथील असून त्यांना त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसायासाठी आणल्या असल्याचे व ग्राहकांना पुरवल्या जात असल्याचे पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता वेश्याव्यवसायाला पूरक असे साहित्य या फार्म हाऊस वर आढळून आले आहे. पोलिसांनी येथील एजंट रवींद्र पांडुरंग करले तसेच मॅनेजर् व मालक सुरेश वरेकर यांच्याकडून 1 लाख 67 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सूरज वरेकर, रवींद्र करले व प्रसाद महाडिक या तिघांना व पीडित तीन महिला ना ताब्यात घेतले असून पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रवींद्र करले हा वेश्या व्यवसायाला मुली, महिला पुरवणारा एजंट असून तो म्हाळुंगे येथे गिऱ्हाईक आणून त्याच्याकडून चार हजार रुपये घेऊन शारीरिक संबंधासाठी मुली देत असे. अशी ही माहिती समोर आली आहे. या फार्म हाऊस वर जप्त केलेल्या मुद्देमालात पांढऱ्या रंगाची कार व मोबाईल संच देखील जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी फिर्याद कोल्हापूर पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंदराव सोपान पाटील यांनी पोलिसात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पन्हाळा पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी या करत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणी व तीन आरोपींना शुक्रवार (दि.17) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT