Latest

कोल्हापूर महापालिका निवडणूक नोव्हेंबरला?

backup backup

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोल्हापूर महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरला होण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होतील, असे सुतोवाच दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या चर्चेला ऊत आला आहे. इच्छुकांच्या नजरा निवडणुकीकडे लागून राहिल्या आहेत.

कोल्हापूर महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु कोरोनामुळे निवडणूक स्थगित झाली. आतापर्यंत तीनवेळा निवडणूक प्रक्रिया सुरू करून ती स्थगित करण्यात आली आहे. सद्यस्थितीत महापालिकेवर प्रशासकराज आहे. सभागृह संपून अडीच वर्षे झाल्याने सर्वांचे डोळे निवडणूक कधी होणार? याकडे लागले आहेत.

SCROLL FOR NEXT