Latest

‘कोल्हापूर’च्या बदल्यात ‘सांगली’चा विषयच नव्हता : आ. सतेज पाटील

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर लोकसभेच्या जागेच्या बदली सांगलीची जागा शिवसेनेला देण्याचा कोणताही विषय नव्हता. सांगली लोकसभेची जागा पारंपरिक पद्धतीने काँग्रेसलाच मिळाली पाहिजे, अशी आमची इच्छा होती. उद्धव ठाकरे यांनी उमेदवार घोषित करणं, हा त्यांचा निर्णय आहे; परंतु सांगलीच्या जागेबाबत सकारात्मक काही घडेल, अशी अजूनही अपेक्षा असल्याचे आ. सतेज पाटील यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सांगलीची जागा काँग्रेसची आहे. येथून विशाल पाटील उभे राहिले तर ते निश्चित निवडून येतील, असे सांगून आ. पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांनी शाहू महाराज यांच्याबद्दल घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध पाहायला मिळाले, असे सांगितले. राजू शेट्टी यांच्या भूमिकेबद्दल बोलताना त्यांनी शेट्टी यांच्याबाबत पुढच्या दोन दिवसांत निर्णय होईल. हातकणंगलेची जागा शिवसेनेची आहे, पण शेट्टी यांनी आमच्यासोबत यावे ही अपेक्षा आहे. महायुतीच्या खासदाराला पराभूत करणे हा महाविकास आघाडीचा अजेंडा असेल. आमच्या विचाराचा खासदार दिल्लीत जावा, अशी आमची भूमिका आहे.

राजू शेट्टी यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना ते म्हणाले, राजू शेट्टी यांच्याबाबत पुढच्या दोन दिवसांत निर्णय होईल. हातकणंगलेची जागा शिवसेनेची आहे, पण आम्हाला वाटते की राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची भूमिका आहे.

उदयनराजेंना दिल्लीत भेट मिळेना

उदयनराजे यांना दिल्लीत जाऊन तीन दिवस भेट मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुणाला किती आदर आहे, हे समोर आले आहे. गरज होती त्यावेळी उदयनराजे यांच्या घरात जाऊन सन्मान करणार्‍या भाजपला त्यांची आता गरज आहे की, नाही मला माहीत नाही, पण दिल्लीत तीन दिवस जाऊन सुद्धा उदयनराजे यांना भेट दिली जात नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे आ. पाटील म्हणाले.

SCROLL FOR NEXT