Latest

Kolhapur : कोळगावच्या तन्मया पाटीलला बँडी स्केटिंग हॉकी स्पर्धेत सुवर्णपदक

Sonali Jadhav

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : गोवा येथे पार पडलेल्या १२ वर्षांखालील वयोगटात ५ व्या बँडी स्केटिंग हॉकी फेडरेशन कप-२०२३ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने सुवर्णपदक मिळवले. त्यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील कोळगाव येथील तन्मया शिवराज पाटील (वय १२) या मुलीने सुवर्णपदक मिळविले. तिला व्ही स्टार रोलर स्केटींग अकॅडमी कोल्हापूरच्या कोच विजया पाटील, आई ज्योती पाटील व वडील शिवराज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्राच्या मुलीच्या संघात व्ही स्टार अकॅडमीच्या तन्मया पाटील (कोळगाव, ता. शाहूवाडी), आरोही माळी व आरोही वाडकर (दोघी कोल्हापूर) या तीन मुलींचा समावेश होता. या यशाबद्दल तन्मयाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. (Kolhapur)

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT