Latest

Zero Shadow Day : सावली सोडणार साथ! २ दिवस कोल्हापूर जिल्हा अनुभवणार शून्य सावली दिवस

अमृता चौगुले

कुरुंदवाड; जमीर पठाण : कोल्हापूर जिल्ह्यात 5 ते 6 मे पर्यंत दोन दिवस एक नैसर्गिक चमत्कार पहायला मिळणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी शून्य सावली अनुभवता येणार आहे. सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि शून्य सावली दिवस अनुभवता येते. हा योगायोग शुक्रवार आणि शनिवारी अनुभवता येणार आहे. (Zero Shadow Day)

दरम्यान सूर्याचा उत्तरायण सुरू झाला असून शुक्रवारी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी 50 सेकंदासाठी खिद्रापूर परिसरात शून्य सावली अनुभवता येणार आहे. (Zero Shadow Day)

खिद्रापूरच्या (ता. शिरोळ) कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडप आणि त्याच्या ओळंबा रेषेत खाली असणारी रंगशिळा येथे शुक्रवार दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी 50 सेकंदाच्या वेळी शून्य सावलीचा अनुभव पहायला मिळणार आहे. (Zero Shadow Day)

शिरोळ भागात शुक्रवारी 12 वाजून 25 मिनिटांनी 25 सेकंद या कालावधीत हा अनुभव घेता येणार आहे. तसेच 30 किलोमीटर उत्तरेला म्हणजेच शनिवारी दुपारी कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली या पट्ट्यात शून्य सावली अनुभव घेता येणार आहे.

शून्य सावलीचा अनुभव कसा घ्याल ?

शून्य सावलीचा अनुभव घेण्यासाठी दिलेल्या वेळेनुसार सूर्य निरीक्षण करावे. समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल. यासाठी दोन, तीन इंच व्यासाचा, एक दोन फूट उंचीची पोकळ प्लास्टिक पाईप किंवा कोणतीही उभी वस्तू अथवा आपणही उन्हात सरळ उभे राहावे. सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली पाहायला मिळणार नाही.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT