Latest

कोल्हापूर : खासगी सावकारीतून नागावच्या तरुणास बेदम मारहाण

Shambhuraj Pachindre

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : शिरोली पुलाची (ता . हातकणंगले) येथील खासगी सावकाराह दोघांनी नागाव येथील एका तरुणास आर्थिक व्यवहारातून अर्धनग्न करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरूण गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, नागाव (ता.हातकणंगले) येथील सागर सुधाकर समुद्रे (वय ३७) याला खासगी सावकार वैभव माजगावकर, धनाजी गुरव ( रा. पुलाची शिरोली ता.हातकणंगले) व अभिजीत शिंदे (रा.संभाजीनगर, नागाव ता. हातकणंगले) यांनी अर्धनग्न करून अमानुषपणे मारहाण केली. सागर समुद्रे हा नागाव ग्रामपंचायत मध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. त्याने दोन महिन्यापूर्वी तब्येत बरी नसल्याने दवाखाण्यासाठी वैभव माजगावकरकडून व्याजाने पाच हजार रुपये घेतले होते. त्यावेळी सागरने कोरा चेक वैभवकडे दिला होता. या प्रकरणात नागाव येथील अभिजित शिंदे हा मध्यस्थी होता.

वैभवने सागर व अभिजितकडे पैशासाठी तगादा लावला होता. यामुळे बुधवारी (दि. ८) मे रोजी अभिजितने सागरला नागाव फाटा येथे बोलावून घेतले. यानंतर अभिजित सागरला शिरोली परिसरातील एका बियर बारमध्ये घेवून गेला. यावेळी वैभव आणि धनाजीही तिथे होते. बारमध्ये मद्य प्राशन करताना पैशाचा विषय काढल्यानंतर सागरने त्यांना पाच हजार रुपये दिले. व उर्वरित व्याजाची रक्कम थोड्या दिवसांनी देतो असे सांगितले. पण वैभव, धनाजी आणि अभिजितने व्याजाचे पैसे आताच दे असा आग्रह धरला. परंतु, पैसे न मिळाल्याने त्यांनी सागरला चारचाकी गाडीत घालून नग्नकरून बेदम मारहाण केली.

काही वेळाने सागरच्या पत्नीचा सागरला फोन आल्यावर तिलाही यांनी गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. सागरने पैसे दिले नाहीत. तर तू पैसे फेडायचे, नाहीतर तुझे घर माझ्या नावावर करून दिले पाहिजे असे धमकी दिली. पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर, तुम्हाला सोडणार नाही. माझी पोलीस स्टेशन तसेच सगळीकडे ओळख आहे, त्यामुळे मला कोण काय करू शकत नाही अशी धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी सागरने तक्रार देण्याचे धाडस केले नाही. पण मारहाण झाल्यापासून आजपर्यंत पैशासाठी धमकीचे धमकी येत असल्याने त्यांनी शिरोली पोलिसांत तक्रार दाखल केली. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात सपोनि पंकज गिरी यांनी संबंधितांनावर गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT