बिद्री : पुढारी वृत्तसेवा, बिद्री येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकीसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत ५६ हजार ९१ मतदारापैकी २९ हजार ६६२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ५२.८८ टक्के मतदान झाले. शासकीय यंत्रणेने प्रत्येक केंद्रात ४ बुथ उभारल्यामुळे मतदानाचा वेग चांगला झाला होता. त्यामुळे मतदार रांगा विरळ होत्या. (Kolhapur)
बोरवडे येथे वृद्ध व्यक्तीचे मतदान करण्यावरून कार्यकर्त्यांत किरकोळ वादावादी झाली. यानंतर मतदान शांततेत सुरु झाले.
कारखाना कार्यक्षेत्रात सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रिसे सुरवात झाली. सकाळी ९ ते ११ वेळेत मतदान केंद्रावर गर्दी होत होती. पण मतदानाचा वेग पहाता गर्दी कांही वेळात कमी होत होती. गट नेत्यांनी मतदान केंद्राला पहाणी करून कार्यकर्त्यांकडून माहिती घेत होती. मंत्री मुश्रीफ, 'शाहू' ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ' गोकुळ' चे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी खेबवडे, बाचणी, दोन्ही वाळवे, बिद्री, बोरवडे मतदार केंद्राना भेटी देवून पहाणी केली.'बिद्री' चे चार तालुक्याचे कार्यक्षेत्र आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत शासकीय यंत्रणेने दिलेली मतदान टक्केवारी अशी, राधानगरी तालुका सरासरी ४९ टक्के, कागल तालुका सरासरी ५० टक्के, भुदरगड तालुका सरासरी ५० टक्के व करवीर ४८ टक्के मतदान झाले.
हेही वाचा