Latest

Kojagiri Purnima 2022 : खास कोजागिरी पौर्णिमेसाठी असे बनवा ‘मसाला दूध’

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: आज शरद पौर्णिमा म्हणजेच, कोजागिरी पौर्णिमा. हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. या दिवशी देशभरात खीर किंवा मसाले दूध बनवले जाते. त्यानंतर रात्री उशिरा ते चंद्राच्या शितल छायेत ठेवले जाते, जेणेकरून चंद्राची शितलता त्यामध्ये उतरावी आणि ते शरीरासाठी आरोग्यदायी ठरावे. यादिवशी देशभरात खीर बनवली जाते, पण महाराष्ट्रात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त खास दूध, मसाला दूध किंवा केशर दूध (Kojagiri Purnima 2022) बनवले जाते.

मसाला दूध (Kojagiri Purnima 2022 ) हे लोकप्रिय भारतीय पेय आहे. महाराष्ट्रात ते कोजागिरी पौर्णिमेला बनवले जाते. ही पौर्णिमा नवरात्रीनंतर येते. रात्री उशिरापर्यंत जागून चंद्राला मसाला दुधाचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे. नंतर प्रसाद हे दूध सर्वजण एकत्रित बसून घेत या क्षणाचा आनंद घेतात. थंडीच्या दिवसात हे दूध पिण्यात एक वेगळीच मजा असते. चला तर पाहूयात कसे बनावायचे सहज आणि सोप्या पद्धतीने मसाला दूध.

साहित्य:

• २ कप दूध
• २ चमचे साखर
• ८ ते १० बदाम
• १० ते १२ पिस्ता
• ३ ते ४ हिरवी वेलची
• ७ ते ८ केशर स्ट्रँड
• जायफळ

कृती:

• एका पातेल्यात दूध घेऊन ते प्रथम चांगले गरम करा.
• त्यानंतर त्यामध्ये साखर घालून ते साखर विरघळेपर्यंत ते चांगल्या पद्धतीने ढवळावे.
• साखर विरघळल्यानंतर, पुन्हा दूध आणखी ८ ते १० मिनिटे उकळवा.
• त्यानंतर बदाम, पिस्ता, हिरवी वेलची मिक्सरच्या भांड्यात घ्या. याची बारीक पावडर करा.
• या पावडरमध्ये जायफळ किसून घ्या आणि पुन्हा हे व्यवस्थित मिसळून घ्या.
• उकळत्या दुधात ही तयार झालेली मसाला पावडर घालून दूध नीट ढवळून घ्या.
• त्यानंतर यामध्ये केशर घालून मिक्स करा.
• आणखी ४-५ मिनिटे हे दूध उकळा, त्यानंतर हे दूध पिण्यासाठी तयार असेल.
• दूध ग्लासमध्ये घेतल्यानंतर वरून सजावटीसाठी तुम्ही काजू, बदाम, पिस्त्याचे काप आणि केसर टाकू शकता.
• यानंतर तुम्ही हे गरम दूध पिण्यासाठी सर्वांना सर्व्ह करू शकता.

टिप:

• पिस्ता साधा असावा. खारट पिस्ते वापरू नका.
• दूधात केशर वापरल्यास छान रंग आणि चव येते.

SCROLL FOR NEXT