Latest

कोजागिरी पौर्णिमा 2022 : या पौर्णिमेला लक्ष्मीच्या पूजेचे आहे विशेष महत्व; जाणून घ्या शुभ वेळ, पद्धत आणि महत्त्व

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क : आश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी लक्ष्मी देवता आपल्या भक्तांवर खूप प्रसन्न होते असे मानले जाते. धार्मिक ग्रंथानुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रमंथन केल्यावर देवी लक्ष्मी प्रकट झाली. त्यामुळेच या दिवशी लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये असेही वर्णन आहे की, या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने तिला विशेष लाभ मिळतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीदेवीची निश्चित वेळेतील पूजा फार फलदायी मानली जाते. त्यामुळे चला तर जाणून घेऊया कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व(कोजागिरी पौर्णिमा 2022) …

कोजागिरी पूजा २०२२ : रविवार, ९ ऑक्टोबर २०२२

पौर्णिमा सुरूवात : ९ ऑक्टोबर २०२२ सकाळी ३ वाजून ४१ मिनिटे

पौर्णिमा समाप्ती : १० ऑक्टोबर २०२२ सकाळी २ वाजून २४ मिनिटे

पूजेचा शुभ मुहूर्त किंवा निश्चित वेळ : रात्री ११ वाजून ४४ मिनिटे ते १२ वाजून ३३ मिनिटे

पूजेचा निश्चित कालावधी : ४९ मिनिटे

यादिवशीची चंद्रोदयाची वेळ : सायंकाळी ५ वाजून ५१ मिनिटे

कोजागिरी पौर्णिमा 2022: काय आहे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व

हिंदू धर्मग्रंथानुसार, कोजागिरी पूजेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीच्या प्रदक्षिणेसाठी येते. या दरम्यान ती "को जाग्रतः" म्हणजेच कोण जागे आहे, असे विचारते. यामुळेच शरद पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या पोर्णिमेविषयी असेही म्हटले जाते की, कोजागिरी पूजेच्या दिवशी जो कोणी देवी लक्ष्मीला खीर अर्पण करतो, त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही.

असा करतात कोजागिरी पौर्णिमेचा पूजा विधी

पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मीचा जन्म कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी झाला होता, असे मानले जाते, दिवाळीपूर्वी कोजागरी पूजेच्या दिवशी लक्ष्मी देवी भटकंतीसाठी निघते. यादरम्यान, ती पाहते की कोण जागे आहे? तिची पूजा कोण करत आहे? अशा परिस्थितीत जो कोणी या दिवशी रात्री निश्चित मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करतो, माता लक्ष्मी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करते.

या दिवशी घर स्वच्छ ठेवावे असे म्हणतात. जेणेकरून आई लक्ष्मी घरात प्रवेश करून वास करू करेल. या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदयानंतर रात्री पूजा केली जाते. या ठराविक शुभ मुहूर्तावर, निश्चित काळात अष्ट लक्ष्मीची पूजा केल्यानंतर तिला खीरीचा नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी खीर स्वच्छ कापडाच्या भांड्यात बांधून रात्रभर चंद्राच्या प्रकाशात ठेवावी. यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी प्रसादाच्या रूपात ग्रहण केल्याने घरात समृद्धी राहते, असेही सांगितले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT