[web_stories title="false" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="See More Web Stories" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
पुढारी ऑनलाईन डेस्क : Kohli vs Ganguly : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) स्टार खेळाडू विराट कोहली आणि दिल्ली कॅपिटल्सचे (DC) क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. डीसी आणि आरसीबी यांच्यातील सामन्यानंतर दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दादा आणि किंग कोहली एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आरसीबीने डीसीचा 23 धावांनी पराभव केला. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा हा सलग 5 वा पराभव आहे. या सामन्यात विराट कोहलीने शानदार कामगिरी करत 50 धावांची मौल्यवान खेळी केली.
विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील 'वाद' थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केल्यानंतर विराट कोहली डीसी टीमच्या सदस्यांशी हस्तांदोलन करत असताना सौरव गांगुली त्याच्यासमोर आल्यावर त्याने दुर्लक्ष केले आणि 'दादा'शी हस्तांदोलन करणे टाळले. यापूर्वी, आणखी एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये सौरव गांगुली सीमारेषेवर उभ्या असलेल्या विराट कोहलीकडे दुर्लक्ष करताना दिसले. (Kohli vs Ganguly)
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्ससमोर निर्धारित 20 षटकांत 175 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरच्या दिल्ली कॅपिटल्सचा 23 धावांनी पराभव झाला. यावेळी दिल्लीच्या डावात विराटची आक्रमकता स्पष्ट दिसली. खासकरून मोहम्मद सिराज दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 18 वे षटक टाकत होता. त्याच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेला अमन खान मोठा शॉट खेळताना झेलबाद झाला. त्याचा झेल कोहलीने टिपला. किंग कोहलीने हा झेल घेतल्यानंतर सीमारेषेवर खुर्चीत बसलेल्या सौरव गांगुलीकडे एकटक पाहिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरं तर, 2021 मध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी विराट कोहलीने आरसीबी आणि भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर त्याला वनडे संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आले. याबाबत विराटने सांगितले की, आपण वनडे संघाचे कर्णधारपद सोडण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही, मात्र हा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर गांगुलींनी विराटला हा या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते. मात्र द. आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने पत्रकार परिषदेत याचा इन्कार केला आणि माझ्याशी असे कोणीही बोलले नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेतील पराभवानंतर त्याने कसोटी संघाचे कर्णधारपदही सोडले. येथूनच सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वाद चव्हाट्यावर येऊ लागला.