Latest

कोहिनूर, पाचूजडित कमरबंदासह भारताचा तैमूरही इंग्रजांकडे

मोहन कारंडे

लंडन : गार्डियन या इंग्रजी दैनिकाने कॉस्ट ऑफ क्राऊन मालिकेतून इंग्रजांनी भारतातून काय काय मौल्यवान चिजा लुटल्या, त्याचा गौप्यस्फोट केला होता. कोहिनूर हिरा ही काही इंग्रजांची एकमेव मौल्यवान लूट नाही. अनेक मूर्ती, अनेक चित्रकृतींसह 19 पाचू जडलेला सोन्याचा एक कमरबंदही या लुटीत समाविष्ट आहे. ब्रिटिश शासन काळातील इंडिया ऑफिसच्या अभिलेखागारातील 46 पानांच्या एका फाईलच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे.

पाच वर्षांपूर्वी बकिंगहॅम पॅलेसमध्ये रॉयल कलेक्शनच्या एका प्रदर्शनात या मौल्यवान वस्तूही मांडण्यात आल्या होत्या. चार मोठे माणिक जडवलेला एक हारही खजिन्यात आहे. 325.5 कॅरेटचा माणिक त्यात आहे. त्याला तैमूर रूबीही म्हटले जाते. मोत्यांचे 2 हार आहेत. या हारांत 222 मोती व हिर्‍यांसह माणिकही आहेत.

  • कमरबंद : 19 पाचू जडलेला सोन्याच्या हा कमरबंद कधीकाळी पंजाबचे महाराजा रणजितसिंग यांच्या अश्वशाळेची शान होता. चार मोठे माणिक यात आहेतच. त्यासह यात 325.5 कॅरेटचा सर्वांत मोठा स्पायनल माणिक जडलेला आहे. तैमूर रूबी हार अशीही या कमरबंदाची ओळख आहे.
  • कोहिनूर : 21.6 ग्रॅम आणि 10.5.6 कॅरेटचा कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया कंपनीने 1852 मध्ये ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांना दिला होता.
SCROLL FOR NEXT