Latest

LPG Price Today: वर्षारंभ ‘गुड न्यूजने’ : सिलिंडरच्या दरात कपात; जाणून घ्‍या नवे दर

निलेश पोतदार

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्‍तसेवा नवीन वर्ष सुरू होताच एक आनंदाची बातमी मिळाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमतीत कपात करण्यात आली आहे. नवीन दर आजपासून लागू होणार आहेत.

तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत अंशतः कपात केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कंपन्यांनी सिलिंडरच्या दरात 1.50 रुपयांची कपात केली आहे. नवीन किमती आजपासून म्हणजेच नवीन वर्ष 2024 च्या पहिल्या दिवसापासून लागू होतील. तसे, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. याचा थेट फायदा सर्वसामान्यांना मिळणार नाही. घराच्या किचनमध्ये वापरले जाणारे सिलिंडर जुन्या दरानेच मिळेल.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT