Latest

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | शुक्रवार, २२ मार्च २०२४

Shambhuraj Pachindre

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आज तुम्ही व्यावहारिक कौशल्याने अपूर्ण काम पूर्ण करू शकाल. तुमची प्रशंसा होईल. जवळच्या मित्राला मदत कराल. तसेच कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल, असे श्रीगणेश सांगतात. मुलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. भागीदारीशी संबंधित व्यवसायात सामजस्‍य ठेवणे आवश्यक आहे. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.

वृषभ : श्रीगणेश म्हणतात की, आज मित्राला आर्थिक मदत करावी लागेल. कुटुंबातील सदस्यांसह घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी वेळ जाईल. मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाण्याचाही बेत आखाल. तरुणांनी करिअरला प्राधान्य देणे आवश्‍यक. व्यवसायात कोणतीही नवीन योजना हाती घेताना काळजीपूर्वक विचार करा. पती-पत्नीने सुसंवाद साधावा. प्रकृती ठीक राहिल.

मिथुन : आज तुमचे लक्ष एखाद्या विशिष्ट विषयावर केंद्रित होईल, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्य करणाऱ्या लोकांसोबत थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कोणाचाही कामात हस्‍तक्षेप करू नका. यामुळे नात्यात बिघाड होवू शकतो. जमीन खरेदी-विक्री व्‍यवहार आज टाळा. व्यवसायात काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. घरात आनंदी वातावरण असू शकते. पोटविकारची समस्या जाणवू शकते.

कर्क : तुमच्या आवडीच्या कामांत वेळ व्‍यतित केल्‍याने नवीन ऊर्जा मिळेल. कुटुंबाशी संबंधित समस्या सोडवली जाऊ शकते, असे श्रीगणेश सांगतात. नकारात्मक गोष्टींना प्राधान्‍य देवू नका. जवळच्या व्यक्तीसोबतचे नातेही खराब होऊ शकते. नातेवाईकाच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल. वैवाहिक जीवनात योग्य सामंजस्य ठेवाल. सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवेल.

सिंह : आज इतरांच्या सल्ल्यापेक्षा स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य देणे योग्य ठरेल, असे श्रीगणेश सांगतात. घरामध्ये काही बदलाचे बेत आखले जातील. तुमच्‍या शिस्तबद्धपणाचा इतरांना त्रास होऊ शकतो. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. जास्त ताण आणि कामामुळे डोकेदुखीचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

कन्या : नातेवाईक किंवा जवळच्या मित्रांची उपस्थिती आनंदी वातावरण निर्माण करेल. मुलांबाबतची चिंता दूर झाल्‍याने दिलासा मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवा. कोणत्याही बेकायदेशीर कामात रस घेऊ नका. वादापासून लांब राहा. सर्व बाबतीत संयम आवश्यक, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी घरातील अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवनात योग्य सौहार्द राखला जाईल. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल.

तूळ : आज काही विशेष यश मिळू शकते, असे श्रीगणेश सांगतात. तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळू शकते. घराच्या देखभालीच्या कामात सुधारणा करता येतील. व्यक्तिमत्त्व सुधारण्यात थोडा वेळ घालवा. रागावर नियंत्रण ठेवा. मुलांबद्दल काहीतरी नकारात्मक जाणून घेतल्याने मन चिंताग्रस्त होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. सांधेदुखी वाढू शकते.

वृश्चिक : श्रीगणेश म्‍हणतात की, ग्रहमान अनुकूल आहे. आज मागील अनेक दिवस असणारी चिंता आणि तणाव दूर होईल. भावांसोबतही नाते मधुर होऊन कौटुंबिक वातावरणात सुखद बदल घडून येतील. कुटुंबातील सदस्यांचे विचार समजून घ्या आणि त्यांचा आदर करा. व्यवसायाशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. घरात आनंदी वातावरण राहील. ऍलर्जीशी संबंधित समस्या जाणवू शकते.

धनु : तुमच्यासाठी काळ अनुकूल आहे. विशिष्ट प्रकल्पात यश मिळण्याची शक्यता.वेळेचे मूल्य ओळखा. योग्य वेळी योग्य गोष्ट न केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.व्यवहारात संयम आवश्यक. जुन्या मालमत्तेशी संबंधित समस्या रंगाळेल. भागीदारीशी संबंधित व्यवसायातील जुने मतभेद दूर होऊ शकतात. तब्येत थोडी नरम राहू शकते.

मकर : स्वप्ने वास्‍तवात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. घरात अचानक पाहुणे आल्याने नकारात्मकता वाढू शकते. शेजाऱ्यांशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्यांमध्ये सामंजस्य राहिल. आरोग्याच्या दृष्टीने वेळ अनुकूल नाही. एखाद्या कार्यक्रमाला जाण्याची संधी असू शकते, असे श्रीगणेश सांगतात.

कुंभ : शहाणपणाने घेतलेला निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतो, असे श्रीगणेश सांगतात. तुमची क्षमता आणि योग्य कार्यपद्धती तुम्हाला तुमच्या कामात अधिक गती देईल. तरुणांना त्यांच्या निष्काळजीपणामुळे विश्वासघात होऊ शकतो. बऱ्याचदा अतिविचार यशास मारक ठरु शकतात. तुमच्या व्यावसायिक कामांमध्ये बाहेरील व्यक्तींना हस्तक्षेप करू देऊ नका. वैवाहिक जीवनात काही विसंगती असू शकते. तब्येत थोडी कमजोर असू शकते.

मीन : आज संधीचा फायदा घेण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या गुणवत्तेनुसार योग्य निकाल मिळेल. काही खर्च अचानक वाढू शकतात. तुमच्यावर जबाबदाऱ्यांचा भार पडेल, ज्या नीट पार पाडू न शकल्यामुळे चिडचिड होऊ शकते. व्यावसायिक बाबतीत तुमची समज आणि योग्यता तुम्हाला यश मिळवून देईल, असे श्रीगणेश सांगतात. वैवाहिक जीवनात एकमेकांशी सुसंवाद राखण्यात काही अडचणी येतील. तुमची दैनंदिन दिनचर्या आणि आहार व्यवस्थित ठेवल्याने तुम्हाला निरोगी आणि उत्साही वाटेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT