Latest

MC Stan : दोन वेळचे जेवणही मिळत नव्हते; आज कोट्यवधींचा मालक आहे एमसी स्टॅन

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्याचा रॅपर म्हणून प्रसिद्ध असलेला अल्ताफ तडवी एमसी स्टॅन (MC Stan) कसा बनला, हे माहितीये का? स्टॅनने बिग बॉसच्या १६ व्या सीझनची ट्रॉफी आपल्या नावे केलीय. एकेकाली तो झोपडपट्टीत राहायचा. गरिबीतून वर आलेला या रॅपरचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. (MC Stan)

गरिबीत गेलं बालपण

एमसी स्टॅनचं खरं नाव अल्ताफ तडवी असं आहे. तो पुण्याचा असून रॅपर व्हायचं ठरवलं होतं. त्याचा जन्म ३० ऑगस्ट, १९९९ रोजी पुण्यात झाला. पण त्याच्या आई-वडिलांना त्यानं रॅप करणं आवडत नव्हतं. पण, स्टॅनला गाणी आवडाची. त्यात रॅप सॉन्ग हा नव्या जमान्याचा प्रकार. यातून काय फायदा होणार? त्यापेक्षा मोठं होऊन काहीतरी बनून दाखवावं, अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. त्याचे वडील रेल्वेत हवालदार होते. पण, नीट जेवायला देन घासही मिळायचे नाहीत. घरची हलाखीची परिस्थिती होती. कधी उपाशी तर कधी रस्त्यांवर झोपायला लागायचं. संघर्षमय प्रवास करत स्टॅनने बिग बॉसपर्यंत मजल मारली.

'तडीपार'मधून लोकप्रियतेच्या शिखरावर

तो वयाच्या १२ व्या वर्षी परफॉर्म करू लागला. पण, रॅप करू लागल्यानंतर त्याला ओळख मिळाली. त्याने 'अस्तरफिरुल्ला' हे पहिलं गाणं केलं. यामद्ये त्याच्या आयुष्यातील संघर्ष सांगण्यात आलंय. त्याचे 'तडीपार', 'समझ मेरी बात को', 'वाता' असे रॅप लोकप्रिय ठरले. ' 'समझ मेरी बात को' तरुणांना वेड लावणारं होतं. तर तडीपार अल्बममुळे तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. अनेक सार्वजनिक ठिकाणी त्याने आपले रॅप शूट केले. स्टॅनला हिंदी भाषेवर प्रेम आहे. बिग बॉसच्या सोमध्ये त्याच्या गळ्यामध्ये हिंदी लिहिलेलं एक लॉकेटदेखील पाहायला मि‍ळतं.

एमसी स्टॅनचं आयुष्य अतिशय वादग्रस्तही ठरलं. त्याच्या रॅपवर, गाण्यांवर अनेकदा अपशब्द, वाईट कमेंट्स आल्या आहेत. यामुळेच स्टॅन अनेकदा वादात आला आहे. स्टॅनने बिग बॉस १६ मध्ये येण्याआधी त्याला या शोमध्ये का यायचं याबाबत सांगितलं होतं. लोकांची आपल्याप्रती असलेली प्रतिमा, लोकांचा त्याच्यासाठी असलेला दृष्टीकोन बदलावा, तसंच स्वत:च्या रागावर नियंत्रण मिळवावं यासाठी त्याने बिग बॉस १६ मध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं होतं. एमसी स्टॅनचा झोपडपट्टीत राहण्याचा ते आता बिग बॉस ट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास लाखो लोकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

स्टाईलही हटके

रिपोर्टनुसार, एकेकाळी रस्त्यांवर झोपणारा स्टॅन आज कोट्यवधींचा मालक आहे. हातावर टॅटू, केसांनी पोनीटेल, ८० हजारांचा बूट, एक ते दीड कोटींच्या गळ्यातील चेन अशी त्याची स्टाईल आहे. २३ वर्षांचा स्टॅन आज लक्झरीयस लाईफ जगतो. तो यू-ट्यूर, रॅप सॉन्ग आणि गाण्यांमधून लाखो कमावतो.

बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर एमसी स्टॅनची पहिली प्रतिक्रिया

एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना स्टॅन म्हणाला- 'मला अपेक्षा नव्हती की मी जिंकेल. मला वाटलं होतं की शिव जिंकेल. आमचं असंही बोलणं झालं होतं की एकतर तो जिंकेल किंवा मी जिंकेल. सर्वच स्पर्धक हा शो जिंकण्यास पात्र आहेत, असं मला वाटतं.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT