Latest

गर्भधारणा लांबवण्यासाठी ‘अंतरा’ गर्भनिरोधकाचा कसा कराल सुरक्षित वापर, जाणून घ्या सविस्तर

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात गतवर्षात 791 महिलांनी 'अंतरा' इंजेक्शन वापरत गर्भधारणा तात्पुरती लांबवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन वर्षांत हे प्रमाण सर्वाधिक आहे. इंजेक्शन अत्यंत परिणामकारक असून इतर साधनांइतकेच चांगले गर्भनिरोधक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या 19 प्रसुतीगृहांमध्ये इंजेक्शन मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

शहरात 2020 मध्ये 57 महिलांनी तर 2021 मध्ये 236 महिलांनी 'अंतरा' इंजेक्शनचा लाभ घेतला. गर्भधारणा लांबवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या, निरोध, तांबी यांचा वापर केला जातो. त्याचबरोबर इंजेक्शन अंतरा (डेपो मेड्रोक्सी प्रोजेस्टेरॉन) याचा वापरही उपयुक्त ठरत आहे. दर 3 महिन्यांनी एक इंजेक्शन असे रुग्णांच्या गरजेनुसार व वैद्यकीय सल्ल्याने घेता येऊ शकते.

महापालिकेकडील 19 प्रसुतीगृहांमध्ये 'अंतरा' इंजेक्शन देताना महिलांचे समुपदेशन केले जाते. कारण इंजेक्शन घेतल्यावर मासिक पाळीच्या चक्रामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे बदल होतात. इंजेक्शन घेणे बंद केल्यावर बदल पूर्ववत होतात व अपत्य हवे असल्यास पुढील सुमारे 3 महिने कालावधीत गर्भधारणा होऊ शकते. इंजेक्शनच्या प्रदीर्घ वापराचे फारसे दुष्परिणाम नाहीत. प्रदीर्घ वापरानंतर अल्प प्रमाणात वजन वाढणे अथवा हाडातील कॅल्शिअम कमी होणे हे परिणाम जाणवू शकतात; परंतु वेळोवेळी उपचार घेतल्यास दुष्परिणामांचे निराकरण करता येते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT