Latest

Laapataa Ladies : ऑस्कर जाणार लापता लेडीज? किरण रावने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : किरण राव दिग्दर्शित चित्रपट लापता लेडीज दीर्घकाळ चर्चेत आहे. हा बहुप्रतीक्षेत चित्रपट १ मार्च रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. लापता लेडीज ऑस्करसाठी पाठवले जाईल, असे म्हटले जात होते. (Laapataa Ladies) आता या वृत्तांवर चित्रपट दिग्दर्शक किरण रावने आपली प्रतिक्रिया दिली आहे. किरणने म्हटलं, जर देश आणि प्रेक्षक आमच्या कामाचे कौतुक करते तर ते आमच्यासाठी सर्वात मोठी प्रशंसा असेल. जर आमचा चित्रपट योग्य समजला जात असेल तर प्रतिष्ठीत ऑस्कर साठी आम्ही सादर करू. दिल्लीत या चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी किरण रावने ही प्रतिक्रिया दिली. (Laapataa Ladies)

किरण रावने सर्वकाही बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या रिॲक्शनवर आधारित आहे. या चित्रपटाच्या कहाणीसाठी एक काल्पनिक सेटिंग निवडण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले. ती म्हणाली, जसे की लोक बिहार, यूपी वा महाराष्ट्र म्हणतात आणि हे एक स्पेशल कल्चर आणि एरियाची कहाणी तयार होते. चित्रपटासाठी आम्ही एक काल्पनिक प्रदेश निर्मल प्रदेश बनवलं आहे. यामध्ये पाहायला मिळेल की, महिला जीवनात कोणत्या परिस्थितीतून जातात. हे समजणे खूप गरजेचे आहे. आम्ही त्यास व्यापक बनवू इच्छित नाही. महिलांना आपले नियम बनवण्याचे स्वातंत्र्य मिळायले हवे. आम्ही यावर लक्ष केंद्रित करू इच्छितो.

लापता लेडीज १ मार्चला रिलीज होणार आहे.

काय आहे लापता लेडीजची कहाणी?

लापता लेडीजची कथा दोन वधूंच्या अवतीभोवती फिरते. एका रेल्वे प्रवासादरम्यान, दोघीजण वेगळे होतात. जेव्हा एका पोलिस अधिकारी किशन बेपत्ता प्रकरणाचा तपास सुरु करतात तेव्हा त्यांच्यासोबत काय होते, हे पाहणे, खूप रंजक असेल. जियो स्टुडियोज प्रस्तुत लापता लेडीजची निर्मिती आमिर खान प्रोडक्शन्स आणि किंडलिंग प्रोडक्शन्स बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT