Latest

Khushi Kapoor : श्रीदेवीची लेक खुशीही पडली प्रेमात?

स्वालिया न. शिकलगार

दिग्दर्शक आणि निर्माता बोनी कपूर यांची धाकटी लेक खुशी कपूर हिने 'द आर्चीज' या सिनेमातून बॉलीवूड पदार्पण केले आहे. गेल्या काही दिवसांपासून खुशी कपूर ही सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. (Khushi Kapoor) नुकतेच खुशीने करण जौहरच्या 'कॉफी विथ करण' या शोच्या एका एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने खूपच धमाल उडवून दिली. (Khushi Kapoor)

यावेळी करणने खुशीला विचारले की, 'तू वेदांग रैनाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत, हे खरे आहे काय?' यावर खुशी खास स्टाईलणे उत्तर देत म्हणाली की, 'ओम शांती ओम' या सिनेमातील तो सीन तुम्हाला माहीत आहे का जिथे लोक केवळ ओम आणि मी चांगले मित्र होतो असे म्हणत होते?' खुशीचे हे बोलणे ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या शोचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. 'द आर्चीज' या सिनेमानंतर खुशी कपूर आणि वेदांग . डेट करत असल्याच्या चर्चा आहेत, पण दोघांनीही याबाबत काही खुलासा केलेला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT