Latest

Google Doodle : गुगलकडून पहिले ऑलिंपिकवीर पै. खाशाबा जाधव यांना अनोखे अभिवादन

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाइन : कराड (जि. सातारा) जवळील गोळेश्वर गावचे सुपूत्र तथा ऑलिंपिकवीर पै. खाशाबा जाधव यांची 15 जानेवारी रोजी जयंती आहे. जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची  गुगुलने दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारतातील पहिले ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीगीर होते. सन १९५२ साली त्यांनी हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये फ्री स्टाईल कुस्तीत कांस्यपदक मिळवले. हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.

खाशाबा जाधव यांनी १९४८ साली लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता.
खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. कुस्ती खेळात त्यांची परिसरात ख्याति होती. देशात ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे ते पहिले खेळाडू होते.

सन १९०० मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्वर पदंके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते. ते एकमेव ऑलिंपिक पदक विजेताही होते. ते स्वतःच्या हिमतीवर तयार झाले हाेते.

देशासाठी त्यांनी मिळविलेल्या पहिल्या ऑलिम्पिक पदकामुळे खाशाबा जाधव हे नाव भारतीय इतिहासात अमर झाले आहे. त्यांचे अमुल्य योगदान देशातील कुस्तीगिरांसाठी प्रेरणादायी आहे.

SCROLL FOR NEXT