Latest

दिल्लीतील मेट्रो भिंतींवर लिहिल्‍या खलिस्तान समर्थनाच्या घोषणा; पोलीस अलर्ट मोडवर

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीत G20 शिखर परिषद पार पडणार आहे. संपूर्ण दिल्लीत या शिखर संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, आज (दि.२७) G20 शिखर परिषदेपूर्वी दिल्ली मेट्रोच्या किमान पाच स्थानकांवर खलिस्तान समर्थनाच्या घोषणा लिहिलेले आढळून आले. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल

दिल्लीतील मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर खलिस्तान समर्थक नारे लिहिलेले आढळले आहेत. ते म्हणाले की, नांगलोई पोलीस ठाण्यात सकाळी 11 वाजता घोषणाबाजी केल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे. चार स्थानकांवर या घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. पोलीस उपायुक्त (मेट्रो) जी राम गोपाल नाईक यांनी ही माहिती दिली.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली मेट्रोच्या  पाच स्थानकांच्या भिंतींवर 'दिल्ली बनेगा खलिस्तान' आणि 'खलिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा लिहिण्यात आल्या हाेत्‍या. या घोषणा मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर स्प्रे पेंट करण्यात आल्या होत्या. दिल्ली मेट्रोच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हे संपूर्ण प्रकरण कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित आहे. दिल्ली मेट्रो दिल्ली पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करेल. विशेष म्हणजे ९ आणि १० सप्टेंबर रोजी दिल्लीत G 20 शिखर परिषद होणार आहे, त्याआधी खलिस्तानी संघटनेने हे कृत्य करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे.

दिल्ली पोलीस सतर्क

या घटनेनंतर दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आणि इतर जिल्ह्यांतील पथकांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी या घटनेनंतर सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लाजिरवाण्या कृत्यामागे ज्यांचा हात आहे त्यांच्यावर पोलीस कडक कायदेशीर कारवाई करतील.

SCROLL FOR NEXT