Latest

पुण्यात एकाच दिवशी तब्बल २९ ग्रामपंचायती करणार विधवा प्रथेविरुद्ध ठराव

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाने व महराष्ट्र राज्य महिला आयोगाने या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते त्याला महाराष्ट्रभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी व ४ प्रभागातील नागरिकांनी ९ जून रोजी एकाच दिवशी हा ठराव मंजूर करण्याचे ठरवले आहे.

अशा पद्धतीने खडकवासला मतदारसंघ हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ असेल जो १०० टक्के विधवा प्रथा बंदी करणारा मतदारसंघ ठरेल. मध्यतंरी रुपाली चाकणकर यांच्या काकांचे निधन झाल्यानंतर आपल्या काकूचे कुंकू न पुसता, मंगळसुत्र न काढता विधवा प्रथा बंदीची सुरुवात आपल्या घरापासून केली होती. आता याच्याही पुढे जात आपला संपूर्ण मतदारसंघ विधवा प्रथामुक्त त्या करत आहेत.

यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा, पुण्याचे जिल्हाधिकारी श्री.राजेश देशमुख, मनपा आयुक्त श्री.विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक श्री.अभिनव देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT