Latest

केतकी चितळेची सटकली आणि.. ! चक्क सोशल मिडियावर दिल्या शिव्या

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : केतकी चितळे हे नाव अनेकदा वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टसोबतच जास्त वेळा जोडलं जातं. केतकी तिच्या अभिनयापेक्षा पोस्टमुळेच बरेचदा चर्चेत असते. त्यामुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावरही अगदी सहज येते. आताही असंच काहीसं घडलं आहे.

केतकीने पुन्हा एकदा नव्या वर्षाच्या सुरुवातीला वाद ओढवून घेतला आहे. अर्थात यावेळीही ती नेहमी प्रमाणेच ट्रोलर्सना भिडली आहे.  नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 'माफ करा पण कधीही विसरू नका… हॅप्पी न्यू इयर" असं म्हणत दारूचा ग्लास हातात घेउन ती दिसली. हा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यासोबत "मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है।' हे कॅप्शन देत तिने मद्यपान करतानाच फोटोही शेयर केला.

यावर काहीनी तिचं कौतुक केलं तर काहीनी तिला ट्रोल केलं. एका कमेंटवर मात्र केतकी इतकी संतापली की चक्क तिने त्या यूजरला शिव्या दिल्या. 'हिंदू आहेस ना, मग न्यू इअरला हिंदू देवाला हात जोडतात… तू दारू पिताना व्हिडीओ का काढतेस… खूप तरुण मुलं तुला फॉलो करत आहेत. काही चांगलं लोकांसमोर ठेव हीच अपेक्षा' या कमेंटला रीप्लाय करताना ती म्हणते, ' **** इसमा हे ग्रेगोरियन नववर्ष आहे. पंचांगानुसार नवीन वर्ष नाही. अर्थात तुमच्या पिढीला हा साधा फरक माहित असण्याची अपेक्षा ठेवणं हा माझा मूर्खपणा आहे.'
अर्थात नेटीझन्स केतकीचा हा अवतार पाहून अवाक झाले असतील यात शंका नाही

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT