Latest

Ketaki Chitale पुन्हा चर्चेत, ‘ब्राह्मण तुष्टीकरण’ची ‘ती’ पोस्ट व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Ketaki Chitale) तिने फेसबूक पोस्ट केल्यानंतर तिची पोस्ट व्हायरल होताना दिसतेय. केतकी नेहमीच वादग्रस्त विधानासाठी ओळखली जाते. आता तिने 'ब्राह्मण तुष्टीकरण' आणि अपशब्द यावर पोस्ट केल्यानंतर ती पुन्हा चर्चेत आलीय. (Ketaki Chitale)

या पोस्टनंतर तिच्या या पोस्टवर कॉमेंट्सचा वर्षाव होत आहे. काहींनी तिच्य़ावर जोरदार टीकाही केलीय.

फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणाली केतकी चितळे?

कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःच्या कानांनी ऐकले आणि डोळ्यांनी बघितले, आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक "महापुरुषांनी" एका राजकारणी नेत्यांना ब्राह्मण म्हणून अपशब्द वापरले, अशी बातमी ऐकली!

जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये.

असो. ।।जय हिंद।। ।।वंदेमातरम्।। ।। भारत माता की जय।।

SCROLL FOR NEXT