Latest

केरळमधील शाळेत रुजू झाली देशातील पहिली AI Teacher ! जाणून घ्‍या सविस्‍तर

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( 'AI' ) हा मागील सर्वच क्षेत्रांमध्‍ये चर्चेचा विषय ठरला आहे. तंत्रश्रानातील या प्रगतीने सर्वसामान्‍य आवाक आहेत. एआयच्‍या वापराचे अनेक किस्‍से तुम्‍ही ऐकले असतील. मात्र आता भारतीय शिक्षण क्षेत्रात एआयने पाउल ठेवले आहे. शाळांमध्‍ये एआयचा वापर करणारे केरळ हे देशातील पहिले राज्‍य बनले आहे. येथे पहिली 'एआय' शिक्षिका रुजू झाली आहे. अल्‍पवधीत ती विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. ( Kerala School Makes History With India's First AI Teacher "Iris" )

तिरुवनंतपुरम येथील KTCT उच्च माध्यमिक विद्यालयात 'आयरिस' नावाचा साडी नेसलेला,एआय-सक्षम ह्युमनॉइड रोबोट रुजू झाली आहे. या ह्युमनॉइड रोबोटचा आवाज स्त्रीसारखा आहे. खऱ्या शिक्षिकेची अनेक वैशिष्ट्ये तिच्‍यामध्‍ये आहेत. 'MakerLabs Edutech' कंपनीने हा AI रोबोट सादर केला. त्यानुसार, Iris ही केवळ केरळमधीलच नव्हे तर देशातील पहिली जनरेटिव्ह AI शाळेतील शिक्षक बनली आहे.

केरळमधील शाळेत पहिली 'एआय' शिक्षिका रुजू झाली आहे.

AI Teacher : तीन भाषांचे ज्ञान, विद्यार्थ्यांच्या जटिल प्रश्नांची उत्तरेही देते

आयरिस तीन भाषा बोलू शकते आणि विद्यार्थ्यांच्या जटिल प्रश्नांची उत्तरेही देऊ शकते. MakerLabs च्या मते, Iris चा ज्ञानाचा आधार इतर स्वयंचलित शिक्षण गॅझेट्सपेक्षा खूप विस्तृत आहे. कारण ते ChatGPT सारख्या प्रोग्रामिंगसह तयार केलेले आहे. तसेच विद्यार्थ्यांना अयोग्य विषयांबद्दल माहितीवर प्रशिक्षण दिले जात नाही. यासंदर्भात माध्‍यमांशी बोलताना मेकरलॅबचे सीईओ हरी सागर यांनी सांगितले की, "एआयमध्ये शक्यता अनंत आहेत. जेव्हा एखादा विद्यार्थी प्रश्न विचारतो, तेव्हा आयरिसकडून मिळणारी उत्तरेही मानवी प्रतिसादांसारखी असतात. "कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे, शिकणे केवळ सोपे नाही तर मजेदार देखील असू शकते."

एआय रोबोट शिक्षकांची संख्या वाढवण्याचा विचार

शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा एमएन यांच्या मते, "पहिल्‍या एआय टिचरला विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आता 3000 हून अधिक विद्यार्थी असलेली ही शाळा पुढील शैक्षणिक सत्रात जनरेटिव्ह एआय रोबोट शिक्षकांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT