Latest

मेंदू खाणारा अमिबा शरीरात गेल्याने १५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Arun Patil

तिरुअनंतपुरम, वृत्तसंस्था : केरळमधील अलप्पुझा येथे गुरुदत्त (वय 15) या दहावीतील मुलाने दूषित पाण्याने केलेली आंघोळ त्याच्या जीवावर बेतली आहे. नेग्लेरिया फॉवलेरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमिबामुळे त्याचा अखेर मृत्यू झाला.

संसर्ग झाला होता. त्याला ताप आणि झटके येत होते. तपासणीत प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफ्लायटीसचा संसर्ग आढळून आला. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक्रवारी गुरुदत्तच्या मृत्यूची माहिती दिली. लोकांनी दूषित पाण्याने आंघोळ करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

प्यायल्याने काही होत नाही; पण नाकात गेला…

अमेरिकन सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, हा अमिबा माती आणि उबदार गोड्या पाण्यात राहतो. उदा. तलाव, नद्या आणि गरम पाण्याचे झरे.

ब्रेन इटिंग अमिबा असेही त्याला म्हटले जाते. अमिबा असलेले पाणी नाकात गेले, की मेंदू संक्रमित होतो. हा अमिबा असलेले पाणी प्यायल्याने मात्र संसर्ग होत नाही.

हा अमिबा मेंदूचे मांस खातो. प्रतिजैविकांनी तो नष्ट केला जाऊ शकतो; पण बहुतांश प्रकरणांत उपचाराला वेळ उलटलेला असल्याने रुग्ण दगावतात.

जाणून घ्या…

हा अमिबा साचलेल्या पाण्यात राहतो आणि नाकाच्या पातळ त्वचेतून आत प्रवेश करतो.

अशी घटना अपवादाने घडत असली तरी, सतर्कता महत्त्वाची आहे.

यापूर्वी 1016 ते 2022 दरम्यान अशी 4 प्रकरणे समोर आलेली आहेत. (सर्व घटनांत मृत्यू)

आजाराची लक्षणे

ताप, डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे

SCROLL FOR NEXT