मुंबई – पुढारी वृत्तसेवा : केईएम रुग्णालयातील परिचारिकांचे आंदोलन सध्या परिचारिकांना ३० दिवसाला ८ सुट्ट्या दिल्या जातात. पण कोविड पूर्व काळात असलेला सुट्टीचा पॅटर्न जो ३० दिवसाला ६ सुट्ट्यांचा आहे, तो राबवण्यात येणार आहे. याला परिचारिकांचा विरोध आहे. सध्याचा ८ दिवसांचा पॅटर्नच राबवण्यात यावा, अशी परिचारिकांची मागणी आहे.