Latest

Merry Christmas: फॅन्सना कॅटरीना कैफच्या चित्रपटाची प्रतीक्षा, रिलीज डेट आली

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ सध्या 'मेरी ख्रिसमस' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामुळे साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतिसोबत ती दिसणार आहे. (Merry Christmas) कॅटरीना दीर्घकाळ मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आता फॅन्स तिच्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. अखेर चित्रपट निर्मात्यांनी 'मेरी ख्रिसमस'च्या रिलीज डेट घोषणा केली. (Merry Christmas)

हिंदीसोबत तमिळ भाषेत रिलीज होणार

हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ भाषेत रिलीज केलं जाईल. मेरी ख्रिसमसला वेगवेगळ्या सहाय्यक कलाकारांसोबत दो भाषांमध्ये शूट केलं गेलं आहे. हिंदी भाषेतील चित्रपटात संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टीनू आनंद आहेत. तर तमिळमध्ये राधिका सरथकुमार, शनमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विलियम्स मुख्य भूमिकेत आहेत.

रमेश तौरानी, जया तौरानी यांच्या 'मेरी ख्रिसमस' मध्ये संजय राउत्रे आणि केवल गर्ग यांचेही मोठे सहकार्य आहे. चित्रपट १५ डिसेंबर, २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

SCROLL FOR NEXT