Latest

Kartik Aaryan: बुर्ज खलीफावर झळकला ‘शहजादा’, कार्तिकसाठी तुफान गर्दी

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : कार्तिक आर्यनचा चित्रपट 'शहजादा' १७ फेब्रुवारी रोजी जगभरात रिलीज होत आहे. (Kartik Aaryan) याआधी कार्तिक या चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन करताना दिसत आहे. यावेळी कार्तिक बुर्ज खलीफा पोहोचला. बुर्ज खलिफावर शहजादा झळकला. यावेळी कार्तिकला पाहण्यासाठी फॅन्सनी तुफान गर्दी केली होती. (Kartik Aaryan)

कार्तिक आर्यन आगामी चित्रपट 'शहजादा' सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील गाणे 'कॅरेक्टर ढिला २.०' रिलीज करण्यात आला आहे. यावर फॅन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीतील इंडिया गेटवर 'शहजादा' चा टायटल ट्रॅक लॉन्च झाला होता.

कार्तिकने बुर्ज खलीफावर चित्रपटाचे प्रमोशनल टीझर दाखवले.

दुबईमध्ये फॅन्सशी भेट

कार्तिक आर्यनने आपल्या फॅन्सची दुबईत भेट घेतली. सध्या तो दुबई दौऱ्यावर आहे.

रोहित धवनचे दिग्दर्शन

'शहजादा'च दिग्दर्शन रोहित धवनने केलं आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, कृती सेनॉन, मनीषा कोईराला, परेश रावल, रॉनित रॉय आणि सचिन खेडेकरने अभिनय केला आहे. संगीत प्रीतमचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT