Latest

Shehzada Collection : कार्तिकच्या ‘शहजादा’ने गाठला २० कोंटीचा टप्पा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृती सेनॉनचा 'शहजादा' चित्रपट चर्चेत आला आहे. हा चित्रपट गेल्या शुक्रवारी दि. १७ तारखेला रिलीज झाल्यानंतर चाहत्यांनी थिअटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली, पंरतु, महाशिवरात्री आणि विंकेड असातानाही तिसऱ्या दिवशी चित्रपटाकडे चाहत्यांनी पाठ फिरविली. या चित्रपटाने पहिल्यां दिवसाप्रमाणे कमाई न केल्याने निर्मात्यांची मात्र, निराशा झाली आहे. तर दुसरीकडे कार्तिकच्या शहजादाला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा पठान टक्कर देत आहे. यामुळे चित्रपटाच्या कमाईच्या आकडे कमी होताना दिसत आहे. आतापर्यंत ( Shehzada Collection ) या चित्रपटाने २० कोटींचा टप्पा पार केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकचा हा चित्रपट येण्यापूर्वी चाहत्याचा उत्साह वाढलेला होता, मात्र, चित्रपटाच्या पहिल्या दिवसानंतर चाहत्यांचा प्रतिसाद कमी दिसून आला. चित्रपटाने पहिल्या दिवशी ६ कोटींची भरघोस कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी ६.६५ कोटींची कमाई केली. यानंतर निर्मात्याना वाटले की, सुट्टीच्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढतील, परंतु, चित्रपटाने विकेंड आणि महाशिवरात्री सुट्टीच्या दिवशी फक्त ७.३० कोटींची कमाई केली. यामुळे चित्रपटाला सुट्टीचा फारसा फायदा झालेला दिसला नाही. तर चित्रपटाने आतापर्यत २० कोटीचा टप्पा पार केला आहे.

कार्तिक आर्यन आणि कृती सेनॉन याच्या 'शहजादा' चित्रपट दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमलो' चा रिमेक आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत मराठी अभिनेत्री पूजा हेगडे होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २६२-२८० कोटींची कमाई केली होता. याच दरम्यान शहजादाला शाहरूखचा पठान ठक्कर देत आहे. ( Shehzada Collection )

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT