Latest

Karnataka : विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी कर्नाटकात पुजाऱ्यासह पाचजणांवर गुन्हा

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील (Karnataka) चित्रदुर्ग जिल्ह्यातील एका प्रमुख मठाच्या मुख्य पुजाऱ्यासह पाच जणांवर उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे नझरबाद पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी शनिवारी सांगितले. त्यानुसार मठ चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहाच्या वॉर्डनचाही आरोपींमध्ये समावेश आहे. सूत्रांनी सांगितले की, दोन मुलींनी दिलेल्या जबाबाच्या आधारे तक्रार नोंदविण्यात आली आहे. पुजारीवर सुमारे दोन वर्षे "लैंगिक छळ" केल्याचा आरोप करण्यात आला आणि इतरांनी या कृत्यात संबधित पुजाऱ्याला पाठिंबा दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Karnataka)

पीडित मुलींनी येथील सामाजिक स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला होता. यावेळी समुपदेशनावेळी या मुलींनी आपल्यावर बेतलेल्या भीषण घटना कथन केली. त्यानंतर संस्थेने पोलिसांकडे धाव घेत याबाबतची तक्रार नोंदवली. (Karnataka)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसूर पोलिसांनी प्राथमिक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली आहे आणि आता हे प्रकरण चित्रदुर्गातील अधिकारक्षेत्रातील पोलिस स्टेशनकडे हस्तांतरित केले जाईल, कारण तेथे कथित गुन्हा घडला आहे.

SCROLL FOR NEXT