Latest

Karnataka Elections 2023 | कर्नाटकात काँग्रेसला मिळणार बहुमत? सर्वेक्षणातील अंदाज

दिनेश चोरगे

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे. निवडणुकीत काँग्रेसला 110 ते 122 जागा मिळतील. भाजपला 73 ते 85 आणि निजदला 21 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज आहे. सी-वोटर व इतर संस्थांनी केलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणाचा हा अंदाज आहे. (Karnataka Elections 2023)

सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार, एकदा सत्तेवर आलेले सरकार पुन्हा सत्तेवर येत नाही, या कर्नाटकाच्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. सर्व 224 विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. सध्याचे पक्षीय बलाबल भाजप 119, काँग्रेसला 75 आणि निजद 38 असे आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत नेमके उलटे होण्याची शक्यता आहे. (karnataka legislative assembly)

सर्वेक्षणानुसार कित्तूर कर्नाटकात (मुंबई-कर्नाटक) काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. पण, त्यांना भाजप कडवी झुंज देणार आहे. कल्याण कर्नाटकात सुमारे 75 टक्के जागा काँग्रेसला मिळण्याचा अंदाज आहे. या भागात 50 जागांपैकी 22 ते 25 जागा भाजपला मिळतील. 24 ते 28 जागा काँग्रेस, निजदला 1 आणि इतरांना एक जागा मिळण्याची शक्यता आहेत. सत्तारुढ भाजपला या निवडणुकीत 38 टक्के मतांवर समाधान मानावे लागण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी काँग्रेसची मते वाढणार असून 43 टक्क्यांवर हा आकडा जाणार आहे. निजदला 10 टक्के आणि इतरांना 7 टक्के मते मिळतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

आजपासून सर्वेक्षणावर बंदी

सोमवारी सायंकाळी 6 वाजता विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. मतदानाच्या 48 तास आधी निवडणूकपूर्व सर्वेवर बंदी घालण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 कलम 12 नुसार याबाबत आदेश बजावण्यात आला आहे. मतदानाआधी निकालाचे भाकित केल्यास त्याचा मतदारांवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे नियमाचे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. (Karnataka Elections 2023)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT